---Advertisement---

बापरे! इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला झाली आहे नव्या कोरोना स्ट्रेनची बाधा, फैलाव रोखण्यासाठी श्रीलंकेचा आरोग्य विभाग सावध

On: शुक्रवार, जानेवारी 15, 2021 12:02 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आला आहे. श्रीलंका आणि इंग्लंड संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी पासून सुरू झाला आहे. मात्र इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली आहे. श्रीलंकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी यांची माहिती देताना सांगितले की, कोविड-19चा नवा वॅरियंट त्यांच्या देशात पोहचला आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, या ठिकाणी आल्यावर त्यांची टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये मोईन अली पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

इंग्लंड संघातील हा खेळाडू 4 जानेवारीला पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे त्याला संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे उप महानिर्देशक हेमंत हेराथ यांनी ही माहिती दिली. मुख्य महामारी वैज्ञानिक सुदाम समरवीरा म्हणाले, ब्रिटन मधील हा नवा वॅरियंट वेगाने पसरतो. ज्याच्यामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात याची प्रकरणे समोर येवू शकतात.”

हेराथ म्हणाले, “यामुळे त्यांचा देश कडकपणे या योजनेची प्रक्रिया राबविण्यावर भर देत आहे.” त्यांनी सांगितले की 33 वर्षीय अष्टपैलू मोईन अली या क्रिकेटपटूच्या रूपाने श्रीलंकेत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील सर्व आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहे. कारण मोईन अली पासून इतर कोणत्या लोकांना या घातक विषाणूची लागण होवू नये.

श्रीलंका या देशात मार्च महिन्याच्या महिन्या पासून कोरोना व्हायरस पसरल्याने 50,200 रुग्णाची प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर 247 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. 4 ऑक्टोबरनंतर जवळपास 47,000 प्रकरणे समोर आली आहेत. बर्‍याच देशांमध्ये ब्रिटन मधील नव्या वॅरियंटचे सध्या अहवाल आढळून आले आहेत. ज्यामधे डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नॅदरलँड, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, जपान, कॅनडा लेबनान आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

या मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी पासून सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करताना श्रीलंका संघाचा पहिला डाव 46.1 षटकांत सर्वबाद 135 धावसंख्येवर आटोपला. त्याचबरोबर इंग्लंड संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा 41.2 षटकांत 2 बाद 127 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने 41.2 षटकांत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. जॉनी बेयस्ट्रोने 91 चेंडूचा सामना करताना 2 चौकार ठोकून 47 धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर रूटने 115 चेंडूचा सामना करताना 5 चौकार लगावून 66 धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ पहिला दिवसा संपला तेव्हा 8 धावांनी पिछाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी

SL vs ENG : इंग्लंडच्या दमदार गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजी ढेपाळली, पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाचे वर्चस्व

अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---