श्रीलंका आणि इंग्लंड संघात सध्या दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी पासून सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केल्याने श्रीलंका संघाचा पहिला डाव 46.1 षटकांत सर्वबाद 135 धावसंख्येवर आटोपला. त्याचबरोबर इंग्लंड संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा 41.2 षटकांत 2 बाद 127 धावा केल्या आहेत.
इंग्लंड संघाची सुरुवात सुद्धा श्रीलंका संघाप्रमाणे खराब झाली. इंग्लंड संघाचा सलामी फलंदाज डोमिनिक सिबली 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर जॅक क्राॅली 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरिस्टो आणि जो रूट यांनी इंग्लंड संघाचा डाव सावरताना अनुक्रमे 47 आणि 66 धावांवर खेळत आहेत. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची नाबाद खेळी केली. श्रीलंका संघाकडून लसिथन एम्बुलदिनीयाने 18 षटके गोलंदाजी करताना 55 धावा देत दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामी फलंदाज लाहिरू थिरिमने आणि कुसल परेरा अनुक्रमे 4 आणि 20 धावांवर बाद झाले. त्यामुळे श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली. श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमल यांनी केल्या. या दोघांनी अनुक्रमे 27 आणि 28 धावांचे संघासाठी योगदान दिले. त्याचबरोबर दसुन शनाकाने 48 चेंडूचा सामना करताना 3 चौकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी साकारली. मात्र इतर खेळाडूंनी काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव 46.1 षटकांत सर्वबाद 135 धावसंख्येवर आटोपला.
इंग्लंड संघाकडून सर्वाधिक जास्त विकेट्स डॉम बेसने घेतल्या. त्याने 30 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडने 3 विकेट्स घेताना 20 धावा खर्च केल्या. तसेच जॅक लिचने 17 षटके गोलंदाजी करताना 55 धावा देताना 1 गडी बाद केला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने 41.2 षटकांत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. जॉनी बेअरिस्टोने 91 चेंडूचा सामना करताना 2 चौकार ठोकून 47 धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर जो रूटने 115 चेंडूचा सामना करताना 5 चौकार लगावून 66 धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ पहिला दिवसा संपला तेव्हा 8 धावांनी पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी
भोपळ्यांची मालिका संपेना! हा खेळाडू सलग चार डावात झाला शून्यावर बाद, नकोशा यादीत मिळाले स्थान
अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!






