---Advertisement---

भोपळ्यांची मालिका संपेना! ‘हा’ खेळाडू सलग चार डावात झाला शून्यावर बाद, नकोशा यादीत मिळाले स्थान

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 10:12 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि श्रीलंका संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 जानेवारी पासून सुरू झाला आहे. या सामन्यात श्रीलंका संघाच्या कुसल मेंडीसने एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात कुसल मेंडीस शून्यावर बाद झाला. तो मागील सलग चार डावात शून्यावर बाद झाला आहे.

कुसल मेंडीसचे सध्या कसोटी क्रिकेट खराब सुरू आहे. तो इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. यापूर्वी तो मागील तीन डावात शून्यावर बाद झाला. असा विक्रम करणारा तो श्रीलंका संघाचा तिसरा खेळाडू ठरला. श्रीलंका संघाकडून सलग चार डावात शून्यावर बाद होणार्‍या खेळाडूमध्ये नुवान प्रदीपचे नाव सर्वात पहिले आहे. तो आपल्या कारकिर्दीत दोनवेळा सलग चार डावात शून्यावर बाद झाला आहे.

श्रीलंका संघाकडून सलग चार डावात शून्यावर बाद होणारे खेळाडू-

1) कुसल मेंडीस – 4 डावात – (26 डिसेंबर 2020 पासून)

2) गाय डी अलवीस – 4 डावात – (27 डिसेंबर 1986 ते 12 फेब्रुवारी 1988)

3) नुवान प्रदीप – 4 डावात – (28 ऑगस्ट 2015 ते 22 ऑक्टोबर 2015)

4) नुवान प्रदीप – 4 डावात – (2 सप्टेंबर 2017 ते 6 ऑक्टोबर 2017)

मधल्या फळीत 6 व्या क्रमांकावर सर्वाधिक शून्यावर बाद झालेले खेळाडू-

१) डॅनी मॉरिसन-5

२) पंकज रॉय – 4

३) मोहिंदर अमरनाथ – 4

४) मार्क वॉ – 4

५) कुसल मेंडीस – 4

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून सर्वाधिक शून्यावर बाद होणारे खेळाडू- 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सर्वात जास्त वेळा श्रीलंका संघाचा कुसल मेंडीस शून्यावर बाद झाला आहे. तो 2015 नंतर 24 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यांनंतर दुसर्‍या क्रमांकावर इंग्लंडचा मोईन अली आहे. तो 23 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्यानंतर तिसर्‍या स्थानी इंग्लंडचा दुसरा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर चौथ्या स्थानी श्रीलंका संघाचा नुवान प्रदीप आहे. तो 20 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे शैनन गॅब्रीयल आणि सुरंगा लकमल आहेत. हे दोघे ही प्रत्येकी 19 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अपना विहारी सब पर भारी, भाजपा खासदाराच्या त्या टीकेला विरूचे अनोख्या अंदाजात प्रत्युत्तर

भोपळ्यांची मालिका संपेना! हा खेळाडू सलग चार डावात झाला शून्यावर बाद, नकोशा यादीत मिळाले स्थान

हम है तय्यार! ब्रिस्बेन कसोटीसाठी भारतीय संघाचा कसून सराव; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---