---Advertisement---

IND vs WI: तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियात 3 बदलांची शक्यता? कोण होणार बाहेर

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 10:22 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज (T20 Series between india vs west indies) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने 250 धावांचे लक्ष्य गाठत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यातही भारताच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) आणखी काही काळ संधीची वाट पाहावी लागू शकते. भारतीय संघासाठी फलंदाजी ही मोठी समस्या नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

अक्षर पटेल (Axar Patel) गोलंदाजीत महागडा ठरत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 3.3 षटकांत तब्बल 63 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) संधी मिळू शकते.

वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) दुसऱ्या टी-20 सामन्यात 3 विकेट घेतल्या. मात्र, तो बराच महागडा ठरला. त्याने तीन षटकांत 36 धावा दिल्या. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला (Prince Yadav) संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिवम दुबेने (Shivam Dube) बऱ्याच काळापासून मोठी खेळी केलेली नाही. गोलंदाजीतही त्याला विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) संधी दिली जाऊ शकते. रेड्डी गोलंदाजीतही भारतीय संघासाठी उपयुक्त योगदान देऊ शकतो.

तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:- संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, नमन धीर, अक्षर पटेल/रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मयंक यादव/प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---