ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना ब्रिस्बेन येथे चालू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर (१७ जानेवारी) ऑस्ट्रेलिया संघ ५४ धावांनी आघारीवर आहे. दरम्यान आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर लवकरच भारताचा पहिला डाव आटोपून मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली चपराक बसली.
पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धू धू धुतले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन हा यष्टीवरील बेल्स हलवताना दिसला. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. लायनचा हा व्हिडिओ क्रिकेट.कॉम.एयू या वेबसाईटच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
नॅथन लायनने केली ‘काळी जादू’!
झाले असे की, भारतीय संघाचा पहिला डाव ६ बाद २१९ धावांवर होता. फलंदाजी करत असलेला ठाकुर १४ धावा आणि सुंदर २४ धावांवर नाबाद फलंदाजी करत होते. यावेळी लायनने यष्टीवरील बेल्स जागेवरुन इकडे तिकडे केल्याचे दिसले. परंतु त्याचा हे कृत्य करतानाचा प्रकार कॅमेरात कैद झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर टीका केली आहे.
काहींनी शार्दुल आणि सुंदर यांची भागिदारी मोडण्यासाठी लायनने काळी जादू केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर काही क्रिकेट रसिकांनी लायनबरोबर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ याच्यावर निशाना साधला आहे. ‘स्मिथनेच लायनला असे करायला सांगितले असावे, दोघांवरही आजीवन बंदी घालण्यात यावी’, असे त्याने लिहिले आहे.
I'm not superstitious, but I'm a little stitious #AUSvIND pic.twitter.com/4oUr8sGbXL
— cricket.com.au (@cricketcomau) January 17, 2021
https://twitter.com/JRumbol4/status/1350654588760649728?s=20
Wait till someone says "stump tampering "
— ARIN (@arin_bajaj) January 17, 2021
Kaala Jaadu 😂
— Rahul Sharma (@CricFnatic) January 17, 2021
😝😝😝😝 mandir banane walo ne vaxin bana li or gore log kala jadu par utar aaye hai 😜😜😜
— yogeshgavli9 (@yogeshgavli21) January 17, 2021
तंत्रो-मंत्रों से विकेट नहीं मिलते लॉयन भईया
— Shubham (@Shubham91216059) January 17, 2021
Stump temparing 😳😳
— Flamez hunter09 (@Flamezhunter09) January 17, 2021
लायनमुळे का स्मिथ झाला ट्रोल ?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ चालू होता. यादरम्यान स्मिथने ड्रिंक्स-ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर सेंटर मार्क केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओत ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ४९ क्रमांकाची जर्सी घातलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील बॅटिंग मार्क करताना दिसला. त्यावेळी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. त्यामुळे क्रिजवरील भारतीय फलंदाजाचा बॅटिंग मार्क पुसल्याचा आरोप
पुढे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये ४९ क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांनी स्मिथच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, तसेच त्याच्यावर टीका केली. यानंतर लायनने स्टंपसोबत छेडछाड केल्याने स्मिथच्या मुद्द्याला पुन्हा वाचा फुटली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा पुन्हा डर्टी गेम? पीच सोबत छेडछाड करताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद
‘भारतीय संघात खराब शॉट खेळून बाद होण्याची स्पर्धा सुरू आहे का?’ पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांचा प्रश्न