---Advertisement---

डर्टी गेम केल्यानंतर हे तर होणारच होतं! सिडनी कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर चाहत्यांनी स्मिथला म्हटलं ‘गद्दार’

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 11:55 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सोमवारी (११ जानेवारी) सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना अतियश रोमांचक राहिला. या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर यजमान ऑस्ट्रेलियचे सामन्यावर वर्चस्व होते. मात्र सामन्याच्या पाचव्या दिवशी रिषभ पंत व चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकी भागारिदीमुळे आणि हनुमा विहारी व आर अश्विन यांच्या चिवट झुंजीमुळे भारतीय संघाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. शेवटी या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सामनावीर पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ याला देण्यात आला.

स्मिथने सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावात झुंजार शतकी खेळी केली होती. यावेळी १६ चौकारांच्या मदतीने त्याने १३१ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावातही त्याने ८१ धावांची आक्रमक खेळी केली. अशाप्रकारे पूर्ण सामन्यात त्याने सर्वाधिक २१२ धावा केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आयसीसीने ट्विट करत त्याच्या या उपलब्धीचे कौतुक केले. मात्र यानंतर जे काही घडले त्याची स्मिथ आणि त्याच्या चाहत्यानी अजिबात अपेक्षा केली नसणार.

झाले असे की, आयसीसीने स्मिथचा फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले की, “२१२ धावा, एक शतक आणि एक अर्धशतक. प्लेयर ऑफ द मॅच (सामनावीर). स्टिव्ह स्मिथची सामान्य सेवा पुन्हा सुरु झाली आहे.”

आयसीसीच्या या ट्विटनंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी स्मिथला जोरदार ट्रोल केले आहे. ‘धावा करायला सुरुवात तर केलीच सोबत चिटींगचीही सुरुवात केली आहे’, असे काही रसिकांनी म्हटले आहे. तर काहींनी ‘चेंडू छेडछाड प्रकरणानंतरही सुधारणा झाल्या नाहीत. तो नेहमी गद्दारचं राहणार आहे’, अशी टिका केली आहे.

https://twitter.com/PiyushAnandCsk/status/1348544483911061505?s=20

भारतीय चाहत्यांनी का म्हटले स्मिथला गद्दार ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ चालू होता. यादरम्यान स्मिथने ड्रिंक्स-ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर छेडछाड केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओत ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ४९ क्रमांकाची जर्सी घातलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील भारतीय फलंदाजाचे बॅटिंग मार्क पायाने पुसताना दिसत होता. त्यावेळी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसल्यानंतर पंत तिथे फलंदाजी करण्यासाठी आलेलाही या व्हिडिओमध्ये दिसते.

पुढे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये ४९ क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो, त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांनी स्मिथच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्याच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा पुन्हा डर्टी गेम? पीच सोबत छेडछाड करताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद

धक्क्यांवर धक्के आणि आता वज्रप्रहार.! जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका होताना ऑस्ट्रेलियन कॅप्टनने केलं असं काही, वाचून तुम्हीही द्याल शाबासकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---