---Advertisement---

लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर

Nathan-Lyon
---Advertisement---

Nathan Lyon 500 Test Wickets: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 360 धावांच्या मोठ्या फरकाने नावावर केला. या सामन्याचा शिल्पकार मिचेल मार्श ठरला. असे असले तरीही, नेथन लायन याने या सामन्यात इतिहास घडवला. त्याने आपल्या कारकीर्दीतील मैलाचा दगड पार केला.

नेथन लायन 500 कसोटी विकेट्स
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उतरण्यापूर्वी नेथन लायन (Nathan Lyon) याच्या नावावर कसोटीत 496 विकेट्सची नोंद होती. मात्र, या सामन्यात नेथन लायन 500 कसोटी विकेट्स (Nathan Lyon 500 Test Wickets) पूर्ण करण्यात यशस्वी झाला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक आणि आमिर जमाल यांच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात फहीम अश्रफ आणि आमिर जमाल यांना तंबूत धाडले. अशाप्रकारे दोन्ही डावात 5 विकेट्स घेताच त्याच्या कसोटीतील 501 विकेट्स पूर्ण झाल्या.

कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील आठवा गोलंदाज
अशाप्रकारे नेथन लायन कसोटीत 500 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि जगातील आठवा गोलंदाज बनला. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर यात शेन वॉर्न (Shane Warner) याने 708 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ग्लेन मॅकग्राने 563 विकेट्स घेतल्या आहेत.

याव्यतिरिक्त एकूण यादी पाहायची झाली, तर वरील नावांव्यतिरिक्त कसोटीत 500हून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसन (690), अनिल कुंबळे (619), स्टुअर्ट ब्रॉड (604) आणि कर्टनी वॉल्श (519) यांच्या नावाचाही समावेश आहे.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
800 – मुथय्या मुरलीधरन
708 – शेन वॉर्न
690 – जेम्स अँडरसन
619 – अनिल कुंबळे
604 – स्टुअर्ट ब्रॉड
563 – ग्लेन मॅकग्रा
519 – कर्टनी वॉल्श
501 – नेथन लायन*

सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 360 धावांनी पराभूत करत पहिला कसोटी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 450 धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानचा दुसरा डाव 89 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, नेथन लायनने 2 विकेट नावावर केल्या. याव्यतिरिक्त पॅट कमिन्सच्या खात्यात 1 विकेट पडली. (Nathan Lyon Completes 500 Test Wickets Against pakistan Most Test Wickets)

हेही वाचा-
अर्शदीप जोमात, फलंदाज कोमात! पहिल्याच ओव्हरमध्ये पठ्ठ्याने दोघांचा काढला काटा, शून्यावर परतले तंबूत
INDvsSA 1st ODI: यजमानांनी जिंकला टॉस, भारताकडून ‘या’ धुरंधराचे वनडे पदार्पण; पाहा Playing XI

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---