इंग्लंडमधील एजबस्टन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस 2023 चा पहिला सामना केळला गेला. या ऐतिहासिक मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामची सुरुवात झाली. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज नेथन लायनने इतिहास रचला आहे.
आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे दोन हंगाम खेळले गेले आहेत. ऍशेस 2023 ने तिसर्या डब्ल्यूसीटी हंगामाची सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात नेथन लायन () याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना एक जागतिक विक्रम केला आहे. डब्ल्यूटीसीमध्ये 150 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. तिसऱ्या सीझनच्या पहिल्याच कसोटीत त्याने हा भीमपराक्रम केला आहे.
लायनचा भीमपराक्रम:
लायनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 4 विकेट घेत हा विक्रम केला. तत्पूर्वी पहिल्या डावातही त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. या कसोटीत त्याने एकूण 8 विकेट घेतल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत लायनने आतापर्यंत 35 सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण 152 विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या फायनलमध्येही लायनने चांगली गोलंदाजी केली होती. तेव्हा भारताच्या पहिल्या डावात त्यांनी 41 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
या गोलंदाजांचे मोडले विक्रम:
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडने 141 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तिसऱ्या स्थानावर भारताचा फिरकीपटू आर अश्विन आहे. अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 132 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत अव्वल स्थानी आहे. परंतू त्याला डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते.
नेथन लायनची कारकिर्द:
एक पीच क्युरेटर ते ऑस्ट्रेलियाचा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज असा लायनने प्रवास केला आहे. 35 वर्षीय लायनने 2011 साली कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि आजपर्यंत 120 कसोटीत 487 विकेट्स घेतल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाकडून सलग 99 सामने खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या –
Ashes । पावसामुळे व्यर्थ जाणार जाणार ऑस्ट्रेलियाची मेहनत! विजयाच्या जवळ असताना थांबवला गेला सामना
जिम व्हिडिओमुळे विराट वाईटरीत्या ट्रोल; नेटकऱ्यांनी रोखठोक विचारला प्रश्न, ‘काय फायदा अशा व्यायामाचा?’