प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 जुलै) समाप्त झाला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवत, मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. असे असले तरी आता मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. संघाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन हा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर प्रथमच तो संघाचा भाग नसेल.
लॉर्ड्स मैदानावरच आपल्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना त्याने खेळला होता. या कारकिर्दीतील महत्त्वाच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यानंतर ही दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तो या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ तेरा षटके गोलंदाजी करू शकला होता. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो चक्क कुबड्या घेऊन चालताना दिसला. तो या सामन्यात पुढे गोलंदाजी करू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. असे असतानाच चौथ्या दिवशी संघाला गरज असताना तो अकराव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. अगदी एकाच पायावर उभे राहत त्याने 14 चेंडूंचा यशस्वीरित्या सामना केला.
ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकल्यानंतर लायन आता उर्वरित मालिकेत खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. तो लवकरच माहिती रवाना होईल. त्याच्या जागी टॉड मर्फी हा खेळताना दिसू शकतो. बर्फी याने यावर्षी भारत दौऱ्यातूनच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्या मालिकेत त्याने भारताच्या सर्वच फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले. त्यामुळे आता इंग्लंडमधील परिस्थितीय तो कशी गोलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
(Nathan Lyon Officially Ruled Out From Ashes 2023 Remainder Todd Murphy Might Replace Him)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मोनिका पटेलला संधी, श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष
लॉर्ड्सवर बेन ब्लास्ट! संघ पराभूत झाला तरी स्टोक्सने मोडला 24 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड