भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी प्रतिष्ठीत कसोटी मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू व्हायला अजून बराच अवधी बाकी आहे. पण तत्तपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे दावे प्रतिदावे सुरूच आहेत. अलीकडेच कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने ही ट्रॉफी जिंकण्यासाठी स्वत:ला हताश असल्याचे सांगितले होते. आता ऑफस्पिनर नॅथन लायनने दावा केला आहे की, टीम इंडियाचा वाईट रीतीने पराभव होईल आणि ऑस्ट्रेलिया 5-0 ने मालिका जिंकेल. लायनचा हा दावा भारतीय चाहत्यांना अजिबात पचणारे नाही. कारण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत काही काळ आपला दबदबा कायम ठेवला आहे.
यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीच्या स्पर्धेत चार नव्हे तर पाच कसोटी खेळल्या जाणार आहेत. या मालिकेचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे असूनही टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने कांगारुंची निराशा करत सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. यावेळी टीम इंडियाची मालिका विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दोन्ही संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा होणार आहे.
“It’s been ten years since we have won the Border-Gavaskar Trophy. My prediction is 5-0 to Australia.”
– Nathan Lyon on the Willow Talk podcast pic.twitter.com/XlgsB20FZY
— JustMyThoughts (@shaibal_27) September 17, 2024
एका पॉडकास्टमध्ये, ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिलीसोबत उपस्थित असलेल्या नॅथन लायनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल सांगितले, तो म्हणाला “मी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून 10 वर्षे झाली आहेत. इंग्लंडचा भारत दौरा संपल्यावर मी या मालिकेबद्दल विचार करायला सुरुवात केली. मला खेळाची आवड आहे. मला एक चांगला कसोटी सामना पाहायला आवडेल. बऱ्याच काळापसून या मालिकेवर माझे डोळे आहेत. या मालिकेवर माझा अंदाज आहे की ऑस्ट्रेलियन संघ 5-0 ने जिंकेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या गेलेल्या मागील चार मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाने निराशा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा शेवटचा कसोटी मालिका विजय 2014/15 मध्ये होता. तर 2011/12 मध्ये घरच्या भूमीवर क्लीन स्वीप झाला होता. मात्र, आता दोन्ही संघात बरेच बदल झाले असून अनेक तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे सर्वानाच चुरशीच्या स्पर्धेची अपेक्षा असून मालिकेसाठी उत्सुकता आहे.
हेही वाचा-
बीसीसीआयचं लक्ष आहे का? टीम इंडियात संधीसाठी धडपडणारा चहल या लीगमध्ये करतोय कहर!
आयपीएल विजेत्या कर्णधारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? हिटमॅनशी खास नाते
विराट कोहलीच्या शब्दांनी आयुष्य बदलले; युवा गोलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य