सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लॉयनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो मोठ्या-मोठ्या गवतांमध्ये चेंडू शोधत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गल्ली क्रिकेटची आठवण झाली.
वास्तविक, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शील्ड सिरीज खेळली जात आहे. स्पर्धेत 8 ऑक्टोबर रोजी न्यू साऊथ वेल्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात ही घटना घडली. सामन्यादरम्यान विरोधी संघाच्या फलंदाजानं एक जोरदार शॉट मारला, ज्यानंतर चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. नॅथन लॉयन हा चेंडू शोधण्यासाठी स्टेडियमबाहेरील झुडपांमध्ये गेला. तेथे त्यानं भरपूर शोधाशोध केली, ज्यानंतर त्याला चेंडू सापडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नॅथन लॉयनचा हा मजेशीर व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना हसू आवरत नव्हतं. अनेकांना लॉयनची ही परिस्थिती पाहून गल्ली क्रिकेटची आठवण झाली, जिथे साधारणत: अशी घटना पाहायला मिळते. तुम्ही लॉयनचा हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर नॅथन लॉयननं ऑस्ट्रेलियाच्या फिरकीची कमान समर्थपणे सांभाळली आहे. तो सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 7व्या क्रमांकावर आहे. लॉयननं 2011 पासून ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत एकूण 129 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यानं 30.28 च्या सरासरीनं एकूण 530 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 24 वेळा एका डावात 5 किंवा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 50 धावा देऊन 8 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हेही वाचा –
कर्णधार रोहित शर्माने मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले; जखमी मुशीर खानची घेतली भेट
तिसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, गौतम गंभीरच्या खास खेळाडूला स्थान?
Hardik Pandya Birthday : एकेकाळी 200 रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हार्दिक, आज आहे एवढ्या कोटींची संपत्ती!