ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 37 धावा करणारा रिषभ पंत दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये होता. मिचेल मार्शच्या पहिल्याच चेंडूवर तो पुढे आला आणि त्यानं मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पंतला आज वेगानं फलंदाजी करायची होती, कारण भारत तोपर्यंत सुस्थितीत होता. भारताची धावसंख्या 300 च्या पुढे होती. मात्र रिषभ पंत दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनच्या जाळ्यात अडकला आणि यष्टीचीत होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
नॅथन लायननं रिषभ पंतला 96व्या षटकात बाद केलं. पंतनं तोपर्यंत फक्त तीन चेंडू खेळले होते आणि तो लायनवर आक्रमण करण्याचा प्रयत्नात होता. लायननं चेंडू टाकताच पंत क्रिजच्या बाहेर आला मात्र चेंडू ऑफ स्टंपपासून दूर गेला होता. पंतची बॅट आणि चेंडूचा अजिबात संपर्क झाला नाही. विकेटमागे यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीनं चेंडू पटकन झेलला आणि पंतच्या विकेट उडवल्या.
पंत ज्या पद्धतीनं बाद झाला, ते पाहून तो खूप निराश दिसत होता. त्याला माहीत होतं की या सपाट खेळपट्टीवर तो ऑस्ट्रेलियाच्या अडचणी आणखी वाढवू शकला असता. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या कारकिर्दीत केवळ दुसऱ्यांदा स्टंप आऊट झाला आहे. 2021 मध्ये चेन्नई कसोटी सामन्यात तो इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचविरुद्ध अशाचप्रकारे बाद झाला होता.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतनं 4 चेंडूत फक्त एक धाव घेतली. नॅथन लायनच्या या चेंडूपासून रिषभ पंत थोडासा दूर राहिला. जर तो चेंडूच्या दिशेने गेला असता, तर तो त्याला आपल्या पॅडनं देखील खेळू शकला असता. परंतु त्यात यात यश आलं नाही. पंतच्या विकेटसह ऑस्ट्रेलियानं सामन्यात थोडा कमबॅक केला आहे.
हेही वाचा –
IPL 2025; यंदाच्या मेगा लिलावात या दिग्गजांवर असणार सर्वांच्या नजरा, हा खेळाडू ट्रम्पकार्ड ठरणार!
शतक एक रेकॉर्ड्स अनेक! 22 वर्षांच्या यशस्वीनं केली सचिन-गावस्करची बरोबरी
IND VS AUS; पर्थमध्ये तिसऱ्या दिवशीही खेळपट्टीचा रंग बदलला! टीम इंडियासाठी किती धावसंख्या सुरक्षित?