न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू नाथन मॅक्यूलम याने शनिवारी (३० जुलै) डुनेडिनमधील किंग्ज महा विद्यालयामध्ये अधिकृतपणे ‘मॅक्यूलम फॅमिली हाय परफॉर्मन्स क्रिकेट सेंटर’चे अनावरण केले आहे. विद्यालयाने नाथन आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांना याद्वारे अभिवादन केले आहे. नाथम मॅक्यूलमने अनावरणाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत विद्यालयाचे आभार व्यक्त केले आहेत.
नाथम मॅक्यूलमने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘किंग्ज महा विद्याविद्यात फॅमिली हाय परफॉर्मन्स क्रिकेट सेंटरचे अधिकृतपणे अनावर करणे सन्मानाचा क्षण होता. खूप अभिमान वाटतोय. आणि या हृदयास भिडणाऱ्या अभिवादनासाठी मी विद्यालयाचा आभारी आहे. या विद्यालयात मी, ब्रेंडन मॅक्यूलम याच विद्यालयात शिकलो आहोत.’
दुर्भाग्याने ब्रेंडन मॅक्यूलम या अनावरण कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही. कारण तो सध्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्यात व्यस्त आहे.
ब्रेंडन मॅक्यूलम आणि नाथम मॅक्यूलम हे न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असून त्यांनी न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय संघात सेवा दिल्यानंतर हे दोन्ही भाऊ क्रिकेटला पुन्हा काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत. २००९ ते २०१६ दरम्यान नाथन आणि ब्रेंडन यांनी न्यूझीलंडकडून जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. नाथन मॅक्यूलमने ऑफ स्पिनर अष्टपैलू म्हणून न्यूझीलंडचे प्रतिनिधित्त्व केले होते. तर ब्रेंडन मॅक्यूलम एक प्रतिभाशाली यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज होता.
https://twitter.com/MccullumNathan/status/1553239148508884992?s=20&t=rNacEAC448iCGkX8WfUivQ
ब्रेंडन मॅक्यूलमने न्यूझीलंडकडून १०१ कसोटी, २६० वनडे आणि ७१ टी२० सामने खेळले असून यादरम्यान १४ हजारपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तसेच २०१५ विश्वचषकात त्याने न्यूझीलंड संघाचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवासही केला होता.
तसेच ब्रेंडन मॅक्यूलमने जगभरातील कित्येक टी२० लीगमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने १५८ धावांची अविस्मरणीय खेळी खेळत इतिहासात सुवर्णाक्षराने आपले नाव कोरले होते. तर नाथन मॅक्यूलमने ८४ वनडे आणि ८३ टी२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्त्व केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी लीग खेळण्यावर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर
आणखी एका खेळाडूने सांगितले धोनीचे आपल्या करिअरमधील महत्व; म्हणाला, “त्याच्यामूळेच मी…”