सध्या न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका (New Zealand) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी धुव्वा उडवला आणि या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात किवी खेळाडू रचिन रवींद्रने (Rachin Ravidnra) (79 धावा) शानदार खेळी खेळली, पण या सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेला झेल म्हणजे नाथन स्मिथचा (Nathan Smith) अविश्वसनीय झेल. त्याने झेल घेतलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
न्यूझीलंड-श्रीलंका संघात बुधवारी (8 जानेवारी) हॅमिल्टनमध्ये दुसरा वनडे सामना खेळला गेला. हा सामना 37-37 षटकांचा होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना रचिन रवींद्र (79 धावा) आणि मार्क चॅपमन (62 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 9 विकेट्सच्या मोबदल्यात 255 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 30.2 षटकात 142 धावांवर ढेपाळला. विल्यम ओरूर्कने 3, जेकब डफीने 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या डावाच्या 29व्या षटकात नाथन स्मिथने बाऊंड्री लाईनवर ईशान मलिंगाचा आश्चर्यकारक झेल घेतला.
Nathan Smith! A screamer on the Seddon Park boundary to dismiss Eshan Malinga 🔥 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/sQKm8aS07F
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 8, 2025
इशान मलिंगाने विल्यम ओरूर्केचा शॉर्ट आणि वाइड ऑफ बॉल विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला लागला आणि थर्डमॅनच्या दिशेने जात होता, नाथन स्मिथने हा झेल पकडण्यासाठी लांब पल्ला गाठला आणि शेवटच्या सेकंदापर्यंत आपली नजर बॉलवर ठेवली आणि हवेत उडत असताना त्याने दोन्ही हाताने बाॅल पकडला.
आता दोन्ही संघातील मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना (11 जानेवारी) रोजी ऑकलँड येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याचदिवशी रोहित शर्मा बनला होता मुंबई इंडियन्सचा हिस्सा, फ्रँचायझीने शेअर केला 14 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास! VIDEO
पीसीबीची फजिती! पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद
न्यूझीलंडमध्ये घडला इतिहास! या खेळाडूने घेतली 2025 ची पहिली हॅट्ट्रिक