नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीत अर्यमान टंडन विरुद्ध विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
या वर्षी ४ सुपर सिरीज विजेतीपदे मिळवणाऱ्या श्रीकांतने हा सामना २१-१४, २१-१३ असा सरळ सेटमध्ये जिंकला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ११-७ असा सामना सुरु असताना दोघांकडूनही चांगला खेळ बघायला मिळाला. परंतु श्रीकांतने अनुभवाच्या जोरावर १७-१२ अशी आघाडी घेतली आणि अखेर हा सेट २१-१४ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र अर्यमानला विशेष काही करता आले नाही. त्यामुळे श्रीकांतने हा सेट २१-१३ असा सहज जिंकून सामनाही जिंकला.