---Advertisement---

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: युवा महाराष्ट्रासमोर आज पंजाबचे तगडे आव्हान

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 8:26 PM
---Advertisement---

पुणे – पेनल्टी शूट आऊटमध्ये तमिळनाडूचा प्रतिकार मोडून काढल्यानंतर आता ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत युवा महाराष्ट्राची गाठ बलाढ्य पंजाबशी पडणार आहे. उपांत्य फेरीतील ही लढत प्रकाशझोतात मेजर ध्यानचंद मैदानावर खेळविली जाईल.

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील ही महाराष्ट्राची स्वप्नवत घोडदौड आहे. आजपर्यंतची सर्वोत्तम अशीच ही त्यांची कामगिरी आहे. तुलनेत पंजाबने गेल्या दहा वर्षांत पाचव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यात दोन वेळा ते विजेते, तर तीन वेळा उपविजेते ठरले आहेत. पंजाबचा सामना करताना महाराष्ट्राच्या युवकांसमोर फक्त मैदानात उतरून आपले सर्वस्व देण्याची आवश्यकता आहे.

पंजाबसाठी ही लढत फारक काही वेगळी नाही. इतर लढतीप्रमाणेच मैदानात उतरून आपले वर्चस्व राखणे असाच हा सामना त्यांच्यासाठी राहणार आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखायचे हेच त्यांचे आजपर्यंतचे धोरण राहिले आहे आणि त्यात उद्याही काही फरक पडणार नाही. ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेता रुपिंदर पाल सिंग पंजाबची ताकद असला, तरी त्याचा खेळ जवळून पाहिलेला भारताचा माजी गोलरक्षक आकाश चिकटे महाराष्ट्रासाठी उभा राहु शकतो. उपांत्य फेरीत त्यांने आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे उद्या या दोन्ही खेळाडूंचा अनुभव त्यांच्या संघासाठी निर्णायक ठरणार आहे.

पंजाबने स्पर्धेत कमालीच्या संयमी खेळाने आपली घोडदौड कायम राखली. त्यांनी कुठेही अतिआक्रमकता दाखवली नाही, की बचावावर अवास्तव भर दिला. परफेक्ट हॉकीचा खेळ दाखवत त्यांनी आपली आगेकूट सुरू ठेवली. त्यांच्याकडून रुपिंदरने ४, तर लोवलिन जनिथने ३ गोल केले आहेत. तुलनेत महाराष्ट्राने स्पर्धेत गोलधडाकाच लावला होता. पंजाबच्या रुपिंदरला पेनल्टी कॉर्नर वर आव्हान देण्यासाठी महाराष्ट्राचा प्रताप शिंदे तयार आहे. त्याने आतापर्यंत कॉर्नरवर १० गोल केले आहेत. कर्णधार तालेब शाह याने तर स्पर्धेत गोल मागून गोल नोंदवले आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर १२ गोलची नोंद असून, स्पर्धेत ते सर्वाधिक आहेत.

युवा महाराष्ट्राचे सळसळते रक्त आणि पंजाबचा तगडा अनुभव अशी ही लढत होणार असून, आता कोण बाजी मारणार याचे उत्तर आगामी २४ तासांत मिळेल. स्पर्धेतील दुसऱी उपांत्य लढत कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांच्यात होईल.

अशा होतील उपांत्य लढती

उत्तर प्रदेश वि. हॉकी कर्नाटक (सायं. पाच वाजता)
महाराष्ट्र वि. पंजाब (सायं. ७ वाजता)

महत्त्वाच्या बातम्या-

पेहचान कोण? कांबळींनी शेअर केला युवा वयातील फोटो, सचिनला सोडून इतरांना ओळखणं महाकठीण

क्रिकेटवेडा स्मिथ! रात्रीच्या १ वाजता नवीन बॅटने करत होता शॅडो प्रॅक्टिस, पत्नीने व्हिडिओ केला शेअर

अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, कौशल तांबेसह महाराष्ट्राच्या ‘या’ ३ शिलेदाराचाही संघात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---