राष्ट्रीय कबड्डी पंच व सांगली जिल्हा कबड्डी असो. चे पंच प्रमुख सुरेश गुंडप्पा चिखले यांचे वयाच्या ५५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. काल दि.१०एप्रिल रोजी रात्रौ ८-१५च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, म्हणून त्यांना सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पण उपचाराच्या दरम्यात रात्रौ ९-००च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा छोटेखानी परिवार आहे. मनमिळावू व मोकळ्या स्वभावाचे म्हणून पंच वर्तुळात चिखले परिचित होते.
स्पर्धेच्या दरम्यान नियमाबाबत काही वाद निर्माण झाल्यास तो सामंजशाने सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांची अंत्ययात्रा आज दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १०-३०वा. त्यांच्या रहात्या घराकडून निघाली व दुपारी १२-१५ च्या सुमारास सांगली, गावभाग येथील अमरबाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाला मुलाने अग्नी दिला. त्यावेळी भाऊबंद, नातेवाईक, आप्तेष्ट व कबड्डी आणि राजकीय वर्तुळातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.