पुणे: शेल फाउंडेशन ही यूकेमधील धर्मादाय संस्था आणि यूके सरकार यांनी मूव्हिंग विमेन सोशल इनिशिएटिव्ह्ज फाउंडेशन (मोवो) यांच्या सहयोगाने ‘मूव्हिंग बाउंड्रीज’ हे अभियान सुरू केले आहे. महिलांना वाहन चालविण्याचे कौशल्य प्राप्त करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी या इकोसिस्टिममधील अडथळे दूर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे, जेणेकरून टॅक्सी किंवा ई-रिक्षाचालक किंवा ई-कॉमर्स कंपन्यांसाठी डिलिव्हरी एजंट्स म्हणून महिलांच्या रोजगार संधी वाढू शकतील.
या अभियानांतर्गत, मोवोच्या संस्थापक जाई भारती मोटरबाइकवरून भारतभ्रमण करत आहे. ११ ऑक्टोबर पासून ४० दिवस त्या २० हून अधिक शहरांची सफर करणार आहेत आणि या माध्यमातून महिलांनी वाहन चालविण्यास शिकण्याबद्दल त्या जागरुकता निर्माण करणार आहेत आणि महिलांच्या रोजगार संधी वाढविण्यासाठी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी त्या महिलांना प्रोत्साहन देणार आहेत. आज जाई भारती त्यांच्या या भ्रमंतीच्या टप्प्यात पुण्यात पोहोचल्या. त्यांनी हैदराबादपासून ही सफर सुरू केली आणि बंगळुरू, चेन्नई, कोची, गोवा या शहरांना त्यांनी भेट दिली आहे आणि यानंतर मुंबई, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, अमृतसर, श्रीनगर, चंदीगड, नवी दिल्ली, लखनौ,पाटणा, गुवाहाटी, कोलकाता, रांची, भुवनेश्वर इत्यादी शहरांना त्या भेट देणार आहेत.
महिलांनी ड्रायव्हिंगची पॉवर आत्मसात करण्याबद्दल जागृती करणे आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व पैलूंबाबत क्षितिज विस्तारणे, हा या अभियानाचा हेतू आहे. महिलांनी वाहन चालविणे शिकण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत, जेणेकरून उत्पन्न मिळेल, परिणामी वाहतुकीतून होणारे कार्बन उत्सर्जनही कमी होईल, यावर भर देण्यात आला आहे.
‘इव्हन कार्गो’ या सामाजिक उद्योगातर्फे या अभियानाला सहाय्य करण्यात येत आहे आणि ते महिला चालकांना प्रशिक्षण, रोजगार आणि इलेक्ट्रिक वाहनांची मालकी उपलब्ध करून देत आहेत.
‘मूव्हिंग बाउंड्रीज’वर प्रतिक्रिया देताना ‘मोवो’च्या संस्थापक जाई भारती म्हणाल्या, “जगभरात महिलांना एकूणच प्रवासाबाबत बंधनांना सामोरे जावे लागते. त्यांना प्रमाणित दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी लांबचा प्रवास करणे जमत नाही किंवा ज्या रोजगारांमध्ये गुंतागुंतीचा व असुरक्षित प्रवास करावा लागतो ते रोजगारही त्यांना मिळत नाहीत. परिणामी, त्यांना उपलब्ध असलेल्या रोजगारांवर मर्यादा येते. समाजातील प्रत्येक थरातील महिलांना भेटण्यासाठी आणि वाहन चालविणे हा महत्त्वाकांक्षी आणि साध्य करण्याजोगा रोजगार पर्याय करण्यास कार्यशाळा घेण्यासाठी ४० दिवसांची ही सफर करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. महिलांना विश्वासार्ह वाहतूक पर्याय उपलब्ध होईल आणि उदरनिर्वाहासाठी महिला स्वतःच्या मालकीचे वाहन चालवू शकतील, असे सुरक्षित वातावरण तयार करणे हा महिलांसाठी रोजगार संधी वाढविण्याचा एक उत्तम मार्ग आहे.”
या भागीदारीबद्दल शेल फाउंडेशनच्या श्रीमती शिप्रा नय्यर म्हणाल्या, “महिलांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्या याचा प्रचार करण्यासाठी सुरक्षित, परवडण्याजोग्या आणि पर्यावरणस्नेही परिवहन पर्यायाला चालना देण्यासाठी आम्ही मूव्हिंग बाउंड्रीज हे अभियान सुरू केले. वाहन चालविणे शिकून अधिकाधिक महिला या रोजगार संधींचा लाभ घेतील आणि ई-रिक्षा आणि डिलिव्हरी एजंट्स यासारख्या वाहतुकीशी संबंधित क्षेत्रांमध्ये त्यांच्या वाहनांच्या मालक-उद्योजक होतील यासाठी अनु कूल वातावरण तयार करण्यावर आमचा भर आहे. महिलांना वाहतुकीसाठी अधिक सक्षम करण्यास मदत करून महिलांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. अल्प-उत्पन्न गटातील घरांमधील महिलांना प्रशिक्षित करणाऱ्या व रोजगार देणाऱ्या अशा प्रकारच्या उद्योगांना सहाय्य करून आणि क्षमताबांधणीसाठी मदत करून पुढील ५ वर्षांत भारतातील १०० हून अधिक शहरे आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला ई-वाहनांच्या मालक असतील आणि त्या वाहने चालवत असतील, अशी आम्हाला आशा आहे. त्यायोगे इतर महिलांसाठी सुरक्षित वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी वाढेल.”
महिलांसाठी रोजगार व उद्योजकता संधींना चालना देणे हे शेल फाउंडेशनचे ध्येय आहे. यूके सरकारसह शेल फाउंडेशनने २०१७ साली ‘पॉवर्ड’ (प्रमोशन ऑफ विमेन इन एनर्जी रिलेटेड एंटरप्रायझेस फॉर डेव्हलपमेंट) हा महिलाकेंद्रीत कार्यक्रम सुरू केला. भारतात पर्यावरणस्नेही उर्जा आणि वाहतूक मूल्यसाखळीमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. महिलांना वाहतूक व लॉजिस्टिक्स क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यास चालना देणाऱ्या आणि त्यांना उत्पन्न मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे मालक होण्यास सक्षम करणाऱ्या उद्योगांना पॉवर्ड कार्यक्रमाकडून सहाय्य करण्यात येते.
शेल फाउंडेशनबद्दल
शेल फाउंडेशन ही यूकेमध्ये नोंदणी असलेली स्वतंत्र धर्मादाय संस्था (रजिस्टर्ड चॅरिटी नं. : १०८०९९९) आहे आणि अल्प उत्पन्न गटातील समुदायाला गरीबीतून बाहेर येण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी ही संस्था मदत करते. हे साध्य करण्यासाठी ऊर्जा व परवडण्याजोग्या वाहतूक व्यवस्थेची उपलब्धता सुधारण्यासाठी व्यवसाय उपाययोजना आम्ही तयार करतो आणि त्यांची व्याप्ती वाढवतो.
भारतातील यूके गव्हर्न्मेंटबद्दल
लोकांच्या हितासाठी संयुक्तपणे काम करणारी यूके-भारत भागीदारी गुंतवणूक व व्यापार सुधारण्यासाठी मदत करते; दोन्ही देशांमध्ये समृद्धी व रोजगार यांची वृद्धी करते; गरीबी व वातावरण बदल यासह दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या जागतिक पातळीवरील मुद्यांवर संयुक्त कार्यवाहीला बळकटी देते; आणि ज्ञान व तंत्रज्ञान यांची उपलब्धता विस्तारते.
मूव्हिंग विमेनबद्दल (मोवो)
हैदराबादमध्ये स्थित मोवो हा क्रांतिकारी उपक्रम आहे आणि महिलांना दुचाकी आणि तिचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्याशी संबंधित उपजीविकेच्या संधी उफलब्ध करून महिलांना स्वावलंबी होण्यास सक्षम करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारतातील हैदराबादमध्ये असलेली मोवो आतापर्यंत १०,०००+ महिलांपर्यंत पोहोचली आहे आणि १५००+ महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण व संबंधित आवश्यक परवाने दिले आहेत आणि त्यांच्यापैकी काहींची लॉजस्टिक डिलिव्हरी रोजगारामध्ये नियुक्ती केली आहे.
इव्हन कार्गोबद्दल
इव्हन कार्गो ही भारतातील फक्त महिलांचा समावेश असलेली लॉजिस्टिक्स डिलिव्हरी कंपनी आहे. ही कंपनी महिलांना मोबिलिटी (वाहन चालवणे) आणि लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण देते आणि त्यांची डिलिव्हरी एजंट्स म्हणून नियुक्ती करते जेणेकरून त्या सार्वजनिक वावराच्या बाबतीत स्वतंत्र होतील. इव्हन लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून सन्मानाने परिवहन व समान उपलब्धतेची खातरजमा करण्यात येते. महिलाकेंद्रीत प्रशिक्षण, सामाजिक आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून हा हेतू साध्य करण्यात येतो. प्रमुख ई-कॉमर्स भागीदार आणि इतर अनेकांसोबत डिलिव्हरी असोसिएट्स म्हणून काम करण्यासाठी ते महिलांना इलेक्ट्रिक बाइक घेण्यासाठी मदत करतात. २०१६ पासून इव्हन लॉजिस्टिक्सने ५०० महिलांना प्रशिक्षण दिले आहे आणि २५० महिलांना डिलिव्हरी असोसिएट्स म्हणून भारतातील ७ हून अधिक प्रदेशांमध्ये रोजगार मिळवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धावण्याच्या स्पर्धेत हसीना मेहबूब शेखला २ सुवर्ण पदके
सराव सामन्यातील भारताच्या यशाने मायकल वॉनचे बदलले सूर; आता म्हणतोय…
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग