पुणे – खेळाच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही विक्रमाची नोंद होते. एखाद्या खेळात एखादी गोष्ट प्रथमच घडते, तेव्हा तो विक्रम असतो. असाच एक विक्रम २७व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत नोंदला गेला. पुण्याच्या जवळ असलेल्या शिर्डी या धार्मिक नगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथमच सुरुवातीपासून अखेरपर्यंत थेट प्रसारण करण्यात आले होते. देशात अशा प्रकारच्या लांब पल्ल्याच्या कुठल्याही शर्यतीत यापूर्वी अखेरपर्यंत थेट प्रसारण करण्यात आले नव्हते.
महाराष्ट्र सायकलिंग संघटनेच्या या कामगिरीबद्दल भारतीय सायकलिंग महासंघाने समाज माध्यमावरून या कामगिरीचे कौतुक केले. पुण्यातील स्पोर्टीट्युड ही एक क्रीडा व्यवस्थापनामधील संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक संचालक रोशन शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संस्थेने एका आश्चर्यकारक कामगिरीची कल्पना मांडली आणि हाती घेतली. स्पोर्टीट्युडने महाराष्ट्र सायकलिंग संघटनेच्या फेसबुक पेजवरून या स्पर्धेतील विविध शर्यतींचे थेट प्रसारण केले. यामध्ये वैयक्तिक टाइम ट्रायल, मास स्टार्ट्स आणि क्रायटेरियम अशा शर्यतींचा समावेश होता.
ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी रोशन आणि त्याच्या संघासमोर सायकलिंग शर्यतीच्या प्रसारणाचा अभ्यास, प्रसारण पद्धती किंवा उपलब्ध माहिती या सर्वाचा अभाव होता. एक वर्षाच्या अथक मेहनतीतून हे शक्य झाले. उच्च तापमान आणि सतत वेगवान राहणाऱ्या शर्यतीत तेवढ्याच वेगवान पद्धतीने शूटिंग करताना अनेक कॅमेरे तुटणे, ड्रोन निकामी होणे किंवा त्यांचे नुकसान होणे असे अनेक अडथळे आले. रोशन स्वतः एक समालोचक आणि एक अग्रगण्य प्रसारक आहे. त्याला अशा कामाचा अनुभव थोडाफार होता. त्याचा फायदा झाला. पण, साकलपटूंच्या वेगाशी स्पर्धा करण्याचे वेगळे आव्हान त्याला या वेळी पार पाडावे लागले. कॅमेरा स्थिर ठेवून चित्रण करणे, ड्रोन स्विच करणे या सर्व गोष्टी एकत्रित नियंत्रण करण्यासाठी त्याच्या सोबत एक गाडी देखिल प्रवास करत होती. या गाडीचा वेगही ताशी ५० ते ६० प्रतिकिलोमीटर इतका होता.
हे सर्व करण्यासाठी रोशनकडे १५ जणांचा संघ होता. हा संघ एकाचवेळी प्रोडक्शन वाहन आणि मोटरसायकलवरून त्याला सहाय्य करण्यासाठी फिरत होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे प्रसारण कमालीचे यशस्वी झाले आणि देशभरातून अनेकजणांनी या शर्यतीचा आनंद थेट लुटला. पाकिस्तान सायकलिंग संघटनेने तर या थेट प्रसारण सुरु असतानाच कौतुक केले. रोशनसाठी ही उपलब्धी नक्कीच मोठी होती. भारतीय जनतेसाठी प्रयत्नांचा इतिहासच नाही, तर सायकलिंगसाठी हे एक पडलेले पुढचे पाऊल होते. रोशनला आता टूर डी फ्रान्सचे वार्तांकन आणि ऑलिम्पिक दरम्यान होणाऱ्या कॅप्सुलेटेड प्रसारण साद घालत आहे. (National Road Race Cycling Championship 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर