पुणे । वडगावशेरी येथील होरांगी तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ या क्रीडा प्रकारात यश मिळवले. होरांगी तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण पुमसे आणि किरोगी मध्ये २५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत अकॅडमीच्या अन्वी बांगर, तनिषा मुदलीयार, मानस पसारकर, प्रज्वल भोसले, प्रित वांद्रे, मानस भट्ट, निल धोका, गित लुकंड, गंगाधर कुलकर्णी, धनेश थाराकन, जुल्फीकार देवताळे, युतिका कुमार, सान्वी क्षेत्री, क्रिश केदगोणी, सर्वेश केदगोणी, आरुष सणस, संजना पवार, तणमया नांबियार, आयुषी भंडारी, अशवीन गंजी, सहर्ष तालाकोकुला, रघुवीर बजाज, अनिका बजाज, वत्सल गुसेन, प्रिया भापकर, प्रणव भापकर, गितीका गुणीशेट्टी, अन्वी तांभाळे, मनस्वी सिंह, वेद ईगालनी, कालीन्दी सरदेशमूख, तेजस्व सिंह यांनी सुवर्णपदक पटकावले.
प्रांजल पानसे, सियान फर्नांडिस, रिओना फर्नांडिस, ओमकार भगत, अविरल त्रिपाठी, प्रज्वल हलाली, रवी यमजाल, मंथन देवी, अनुज सिंग, सुमेधा साखरे, पार्थ रेगे, आशिरा अख्तर, भावना ऊंद्रु, आविरल त्रिपाठी, अभिता त्रिपाठी, अक्षदा महाराज, नारायणी पाटील, कार्तिकीय चिन्ना, रिशिता चिन्ना, वंश ब्रनवाल, ईशिता ब्रनवाल, प्रथमेश सोनार, श्रीजीत जाना यांनी रौप्यपदक पटकावले. तर कुनाल सिंग, दिव्या रिजवानी, सारंग सरागे, अनयराज पवार, समिक्षा यमजाल, अर्णव सणस, अजिंक्य फडतरे, समृद्धी कोल्हे, समर्थ मेमाणे, शौर्य मुजूमदार, अथर्व पाठक, श्रावणी गंजी, आदित्य ऊंद्रु, वैष्णवी सिंग, ज्ञानेश्वरी ईगाले, रिया सदावर्ते, अमृता पांडे, वेद ईगलनी यांनी कांस्यपदक पटकावले.
होरांगी तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष मास्टर बाळकृष्ण भंडारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. सुवर्ण व रौप्यपदक विजेत्यांना दक्षिण कोरीयात शिष्यवृत्तीमार्फत चोसन विद्यापीठात जाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सांरग धोका, योगेश मुदलीयार, श्रीनिवास केदगोणी, प्रशांत वांद्रे, अपुर्वा रेगे, राजिव त्रिपाठी, विशाल गवते, आरती पासारकर, राखी केदगोणी, शलाखा सणस, वंदना बांगर यांचे सहकार्य लाभले. वैष्णवी वांद्रे, अहाना सैय्यद, ईशान सैय्यद, खुशबू तिवारी, अंजली लोहार, पुजा गुप्ता, सिद्धू क्षेत्री, विनोद शिंदे यांनी पुमसे खेळात पंच म्हणून सहभाग घेतला. रविंद्र भंडारी आणि कपिल अनमल यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–एमएस धोनीसह या भारतीय क्रिकेटपटूंची झाली वनडे क्रमवारीत सुधारणा
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ