fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वंश नांदल, चांदनी श्रीनिवासन यांना अव्वल मानांकन

औरंगाबाद । एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुख्य फेरीसाठी मुलांच्या गटात वंश नांदल तर मुलींच्या गटात चांदनी श्रीनिवासन यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात केवल किरपेकर याने .वेद ठाकूरचा टायब्रेकमध्ये 6-7(5), 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. ईशान देगमवार याने विष्णू भालचंदरचा 6-2, 6-1 असा तर, अनमोल नागपुरेने .स्मित पटेलचा 6-1, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत बिगर मानांकीत तोरीता चक्रवर्तीने तिस-या मानांकीत श्रीनिधी बालाजीचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. प्राप्ती पाटीलने पाचव्या मानांकीत स्वरा काटकरचा 3-6, 7-5, 6-1 असा तर सायना देशपांडेने सातव्या मानांकीत गौरी मानगावकरचा 6-2, 6-2 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी- मुले
केवल किरपेकर(1) वि.वि वेद ठाकुर 6-7(5),6-4,6-3
ईशान देगमवार वि.वि विष्णु बालचंदर (2) 6-2, 6-1
अनमोल नागपुरे वि.वि स्मित पटेल (3) 6-1, 6-1
हनुश गांदीकोटे वि.वि प्रद्युम्न तोमर 4-6, 6-4, 7-5
सार्थ बनसोडे वि.वि द्रिक शहा(5) 6-3, 4-6, 6-4
सुचिर शेशाद्री वि.वि निकिल डोसुझा 6-1, 7-5
मिहिर पर्चा(7) वि.वि अयान गिरधर 6-4, 6-4
राघव अमिन(8) वि.वि जश शहा 6-2, 6-3

मुली:
कायरा चेतनानी(1) वि.वि नैनिका रेड्डी 6-1, 6-1
चेविका रेड्डी(2) वि.वि श्रृती नानजकर 6-3, 6-1
तोरीता चक्रवर्ती वि.वि श्रीनिधी बालाजी (3) 6-0, 6-0
तनिषा देसाई वि.वि संचीता नगरकर 6-3, 6-0
प्राप्ती पाटील वि.वि स्वरा काटकर(5) 3-6, 7-5, 6-1
ईरा शहा (6) वि.वि आहना कौर 6-2, 6-0
सायना देशपांडे वि.वि गौरी मानगावकर(7) 6-2, 6-2
मधुरा शेंडे(8) वि.वि अलिना शेख 7-5, 6-3

मुख्य फेरीची मानांकन यादी- मुले
1. वंश नांदल, 2. ऋषील खोसला, 3. प्रणव रेथीन, 4. वितिन राठी, 5. मनन नाथ, 6. काहिर वारीक,7. हर्ष फोगट, 8. राघव हर्ष

मुली-1. चांदनी श्रीनिवासन, 2. नंदीनी दिक्षित, 3. रिया सचदेवा, 4. कुंदना बंडारू, 5. समिक्षा दबस, 6. रुमा गाईकैवारी, 7. सौम्या रोंडे, 8.कुमारी जगतदेव

You might also like