---Advertisement---

“एका क्षणात माझेच देशावासी माझ्याविरुद्ध झाले”, भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बील भरणाऱ्या चाहत्याचे ट्विट

On: रविवार, जानेवारी 3, 2021 11:51 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेची जितकी चर्चा रंगली, तितकीच चर्चा सध्या एका भारतीय क्रिकेट रसिकाची होत आहे. या क्रिकेट रसिकाचे नाव नवलदीप सिंग असून तो भारतीय संघाचा मोठा चाहता आहे. भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल व नवदिप सैनी हे मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता, तेथे नवलदीपने खेळाडूंना न सांगता त्यांचे हॉटेल बिल भरले. याचा खुलासा त्याने ट्विटरद्वारे केला होता. पण त्याच्या या कृत्यामुळे आता त्याच्यावर लोकांच्या शिव्या ऐकून घेण्याची वेळ आली आहे.

झाले असे की, चाहत्याने आपल्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या नकळत जेवणाचे बिल भरले. त्यामुळे क्रिकेटपटूंनी त्याची भेट घेत आभार व्यक्त केले. मात्र क्रिकेटपटूंनी जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या शंकेने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना एकांतवासात ठेवले आहे. यामुळे क्रिकेट रसिकांनी नवलदीपला खरीखोटी सुनावली आहे.

त्यानंतर नवलदीपने ट्विट करत लिहले की, “लोक मला शिव्या देत आहेत. अपशब्द बोलल्यामुळे मला फरक पडत नाही. मी पंजाबी आहे. आम्ही मित्र एकत्र जमल्यानंतर बोलता-बोलता आपापसात सहज ४००-५०० शिव्या देतोत. पण मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे की, एका क्षणात माझेच देशावासी माझ्याविरुद्ध झाले आहेत. मी सर्वांची क्षमा मागतो आणि अपेक्षा करतो की लवकरच सगळ काही ठीक होईल.”

नवलदीपने दिले होते स्पष्टीकरण

आपल्या चुकीमुळे खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर काही वेळातच नवलदीपने पुन्हा ट्विट करत स्पष्टीकरण दिले होते. त्याने लिहिले होते की ‘पंतने मला मिठी मारली नव्हती. मी जे बोललो ते उत्साहाच्या भरात होते. आम्ही आमच्या संवादांदरम्यान सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळले होते. गैरसमजाबद्दल मी माफी मागतो.’

परंतु जरी नवलदीपने स्पष्टीकरण दिले असले तरी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळे आता पुुढे या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतला जातो हे पहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये

माझाचं उत्साह नडला, पंतने असं काही केलंच नाही! चाहत्याने माफी मागत दिले स्पष्टीकरण

नक्की त्या चाहत्याने असे रोहित पंतच्या हाॅटेल बीलाचे पैसे दिले तरी किती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---