---Advertisement---

नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत

Virat Kohli Navin Ul Haq
---Advertisement---

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादादरम्यान अजून एक नाव चर्चेत राहिले. ते नाव आहे, अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक. विराटने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात नवीन उल हकसोबत लाईव्ह सामन्यादरम्यान वाद घातल्यानंतरच गंभीरसोबत त्याचा वाद झाला. आता नवीनने पुन्हा एकदा विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्रमा खात्यावरून एक स्टोरी शेअर करत नवीनने हा प्रयत्न केला आहे.

मंगळवारी (9 मे) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात वानखडे स्टेडियमवर आमना सामना झाला. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. पण सलामीवीरा आलेला विराट कोहली (Virat Kohli) 4 चेंडूत 1 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ याने या सामन्यात विराटला यष्टीरक्षक ईशान किशन याच्या हातात झेलबाद केले. या सामन्यात विराटने विकेट गमावली तेव्हा नवीन उल हक (Naveen Ul Haq) मात्र उन्हाळ्यात आब्यांचा आनंद घेत होता. नवीनने हाच फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरिला शेअर केला आणि चर्चा सुरू झाल्या. या फोटोत मागच्या बाजूला मुंबई आणि आरसीबीची मॅच सुरू असल्याचे दिसते.

Naveen ul haq
Photo Courtesy: Instagram/ Naveen ul haq Murid

चाहते असा अंदाज बांधत आहेत की नवीनने ही स्टोरी विराटला डिवचण्यासाठीच शेअर केली आहे. असे असले तरी, नवीनने मात्र या स्टोरीत विराटच्या नावाचा कुठेच उल्लेख केला नाहीये. नवीनची ही स्टोरी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, विराट विरुद्ध गंभीर आणि नवीन हा वाद आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात झाला. 1 मे रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीने या सामन्यात जयमान लखनऊला 18 धावांनी पराभूत केले होते. सामना सुरू असताना विराट कोहलीसोबतच मोहम्मद सिराज यानेही लखनऊच्या खेळाडूंसोबत वाद घातला होता. सामना संपल्यानंतर मात्र लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर याने विराटची थेट भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित खेळाडूंमुळे हा वाद थांबला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफने मुंबईविरुद्ध पार केला मैलाचा दगड! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी अवघ्या 27 सामन्यात दाखवली करून
अलटी-पलटी दे घुमाके! फाफ-मॅक्सीच्या धमाकेदार खेळीने आरसीबीची वेगवान सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---