मुंबई इंडियन्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ 81 धावांनी पराभूत झाला. लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यावर्षीच्या आयपीएलमध्ये चर्चेत राहिला. बुधवारी (25 मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगले प्रदर्शन करत मैफिल लुटली. एलिमिनेटर सामन्यात चार विकेट्स घेऊनही नवीन आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लाईव्ह सामन्यात चाहते नवीनला विराट कोहलीच्या नावावने डिवचण्याचा प्रयत्नही करत होते. सामना संपल्यानंतर नवीनने याविषयी प्रतिक्रिया दिली.
इंडियन प्रीमियर लीग 2023च्या 43वा सामना 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला होता. उभय संघांतील या सामन्यात आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, चर्चा नवीन उल हक (Naveen Ul Haq) याचीही झालेली. नवीनने थेट भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) याच्याशीच वाद घातला होता. लाईव्ह सामन्यात आणि सामना संपल्यानंतर विराट आणि नवीन एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी नवीनच्या समर्थनात भारताचा माजी दिग्गज आणि लखनऊ फ्रँचायझी मेंटॉर गौतम गंभीरही विराटशी भिडला होता.
मैदानातील या वादानंतर नवीन मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. त्याला आपल्या सोशल मीडियाव पोस्टच्या कमेंट्स बंद करण्याची वेळ विराटच्या चाहत्यांमुळे आली. असे असले तरी, नवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. बुधवारी लखनऊ शुपर जायंट्सला मुंबईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि संघाच चालू आयपीएल हंगामातील प्रवासही संपला. या सामन्यात नवीनने लखनऊसाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. पण तो फलंदाजी करत असताना मैदानात उपस्थित प्रक्षकांनी विराटच्या नावाने नारेबाजी केली.
नवीन उल हक म्हणाला, “मी या गोष्टींचा आनंद घेतो. मैदानात कोणीही त्याच्या (विराटच्या) नावाचे किंवा इतर कोणत्या खेळाडूच्या नावाने नारे लावले, तर मला चांगलं वाटतं. यामुळे आपल्या संघासाठी चांगले प्रदर्शन कऱण्याची प्रेरणा मला मिळते. तसे पाहता, खेळताना बाहेरच्या गोष्टी आणि आवाजाकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करून असतो. प्रेक्षकांनी नारे लावल्याने किंवा कोणी काही बोलल्यामुळे मला काहीच फरक पडत नाही.”
यावेळी नवीनला लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर याच्याविषयीही प्रश्न विचारला गेला. गंभीरसोबतच्या नात्याविषयी नवीन म्हणाला, “भारतीय संघाचे दे एक दिग्गज खेळाडू आहेत. एका महान क्रिकेटपटूच्या रूपात त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळते. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. एक मेंटॉर, एक प्रशिक्षक, एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून मी त्यांचा सन्मान करतो आणि त्यांच्याकडून खूपकाही शिकलो आहे.”
नवीनने यावर्षी आयपीएलमध्ये 8 सामन्यांमध्ये 219 धावा खर्च करून 11 विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊला पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध क्वॉलिफायर दोन (शुक्रवार, 26 मे) खेळायची आहे. क्वॉलिफायर दोनमध्ये जिंकणारा संघ रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळले. क्वॉलिफायर दोन आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (Naveen Ul Haq’s reply to those chanting Virat… Virat.. in the field)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंजीनियर ते क्रिकेटर… असा आहे मुंबईचा तारणहार आकाश मढवालचा क्रिकेट प्रवास
“मुंबईविरूद्ध फायनल नको रे बाबा”, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी आत्ताच घेतली धास्ती