पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत नवसह्याद्री डायनामाईट्स, पीवायसी डॉन्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात गजानन कुलकर्णी, आशिष डिके, रोहन राजापूरकर, अभिषेक बेटेवर, रमेश पाटणकर, उमेश भिडे आदित्य जोशी यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर नवसह्याद्री डायनामाईट्स संघाने पीवायसी फायटर्सचा 24-3असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात पीवायसी डॉन्स संघाने डेक्कन इ संघावर 20-18 असा विजय मिळवत शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून रणजित पांडे, प्रदीप मेड, केदार देशपांडे, मधुर इंगळहालीकर यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
नवसह्याद्री डायनामाईट्स वि.वि.पीवायसी फायटर्स 24-3(100अधिक गट: गजानन कुलकर्णी/आशिष डिके वि.वि.सोहिल गाला/चारू साठे 6-0; खुला गट: रोहन राजापूरकर/अभिषेक बेटेवर वि.वि.रवी रावळ/आकाश सुपेकर 6-2; 90अधिक गट: रमेश पाटणकर/उमेश भिडे वि.वि.विनायक भिडे/हरीश गलानी 6-1; खुला गट: आदित्य जोशी/गजानन कुलकर्णी वि.वि.राहुल रोडे/भाग्यश्री देशपांडे 6-0);
पीवायसी डॉन्स वि.वि.डेक्कन इ 20-18(100अधिक गट: रणजित पांडे/प्रदीप मेड वि.वि.गिरीश शहा/किरण सोनावणे 6-5 (10-8); खुला गट: अभिजित खारीलकर/अमोल काणे पराभूत वि.केदार जाधव/विश्वजीत पस्त 3-6; 90अधिक गट: तुषार नगरकर/सत्या मूर्थी पराभूत वि.वि.श्रीकांत कुलकर्णी/हेमंत पुरोहित 5-6(6-8); खुला गट: केदार देशपांडे/मधुर इंगळहालीकर वि.वि.मनोज हरीकदार/किरण सोहवना 6-1);