बांगलादेश क्रिकेट बोर्डबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नजमूल हसन यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नजमूल हसन यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला. याच पार्श्वभूमीवर सकराकमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळणार आहे, ज्यामुळे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद ते सोडत आहेत.
बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर (Bangladesh General Elections) शेख हसीना (Sheikh Hasina) पाचव्यांदा पंतप्रधान होत आहेत. विरोधी पक्षांती निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे आवामी लीगची सत्ता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये आली. विशेष म्हणजे संसदेत त्यांना विरोधक देखील नसतील. 7 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा नजमूल हसन (Nazmul Hasan) हेदेखील विजयी झाले. ते याआधीही संसदेचे सदस्य राहिले आहेत. पण यावेळी त्यांना युवा आणि खेळ ही मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे. 11 जानेवारी होजी त्यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारली देखील. याच पार्श्वभूमीवर असा अंदाज लावलाजात होता की, नजमूल हसन बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. शनिवारी त्यांनी स्वतः याविषयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला.
“Nazmul Hasan set to step down as the President of Bangladesh Cricket Board. A significant development in the cricketing landscape. 🏏 #BCB #CricketNews” pic.twitter.com/uLPmWczbfE
— Hemant ( Sports Active ) (@hemantbhavsar86) January 13, 2024
पत्राकर परिषदेत नजमूल हसन म्हणाले, “मी दोन्ही पदे एकाच वेळी सांभाळू शकत होतो. ही दोन पदे एकत्र सांभाळता येणार नाहीत, असा कुठलाच कायदा नाहीये. खेळ मंत्रालय मिळाल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यक्षपद सोडण्याचा काहीच संबंध नाही. याआधी असे अनेक मंत्री राहिले आहेत, ज्यांनी दोन जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडल्या आहेत. विदेशातही असे होत आले आहे. पण मी असे केले नाही, तर योग्य निर्णय ठरेल. कारण जर मी ही दोन्ही पदे स्वतःकडे ठेवली, तर क्रिकेटला जास्त प्राथमिकता देण्याचे आरोप माझ्यावर होतील. एक क्रीडा मंत्री म्हणून मल सर्व खेळांना समान प्राथमिकता द्यायची आहे.”
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार कोणत्याही क्रिकेट बोर्डाचे अधिकारी निवडले गेल्यानंतर त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. त्या हिशोबाने नजमूल यांना ऑक्टोबर 2025 पर्यंत बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी कायम राहावे लागेल. त्याचसोबत बोर्डाच्या कामात सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही, हेदेखील स्पष्ट करावे लागेल. अशात नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसोबत चर्चा करेल, असेही सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये या ‘5’ खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी करूनही बीसीसीआयने केलंय दुर्लक्षित
‘मी वाट पाहू शकत नाही’, स्टीव्ह स्मिथची संघातील नव्या भूमिकेवर मोठी प्रतिक्रिया