भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली. यामध्ये खेळाडूंच्या वर्कलोड आणि दुखापती यांवर अधिक उपायांचा खुलासा केला गेला. बीसीसीआयच्या या बैठकीत नव्या धोरणाचे मुख्य लक्ष्य आयसीसी वनडे विश्वचषक आहे. यामुळे भारतीय संघ निवडीबाबत आणि आयपीएल 2023 शी संबंधीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले.
या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, भारतीय पुरुष वरिष्ठ संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), भारतीय पुरुष वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे उपस्थित होत
बीसीसीआयच्या या बैठकीत सर्वाधिक महत्वाचा मुद्दा खेळाडूंच्या दुखापतींचा होता. मागील काही महिन्यांपासून भारताने अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. काही फिट झाले असून काही त्या मार्गावर आहेत, मात्र यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक भारतातच खेळला जाणार आहे. या स्पर्धेआधी आयपीएल होणार आहे. अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेता एक मोठा निर्णय घेण्यात आला.
भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडू, विशेषत: ज्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा जे दुखापतीतून सावरले आहेत अशांना आयपीएल 2023 च्या काही सामन्यांसाठी किंवा बहुतेक संपूर्ण हंगामासाठी विश्रांती दिली जाऊ शकते, असा निर्णय बीसीसीआयने घेतला. हे काम बीसीसीआय आयपीएल फ्रॅंचायजी आणि एनसीए यांच्यासोबत मिळून करेल.
रोहित शर्मा हा बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकला होता. त्याच्याआधीच दीपक चाहर हा तर दुखापतीमुळे 2022मध्ये अनेक सामन्यांना मुकला. तसेच जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून आणि रविंद्र जडेजा पायाच्या दुखापतीतून सावरत आहे. ही बैठकीत एनसीएच्या मेडिकल स्टाफने खेळाडूंचा रिपोर्ट सादर केला.
(NCA and IPL franchises will manage workload of Indian players leading into the ODI World Cup 2023 BCCI meeting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषकात भारताचं हे चुकलंच! दिनेश कार्तिकने हवा दिल्यामुळे जुना वाद पुन्हा चर्चेत
‘कोणीही पंतकडे जाऊ नका…’, रिषभला भेटल्यानंतर डीडीसीएच्या अधिकाऱ्याने असे का म्हटले? घ्या जाणून