नाशिक । गेल्यावर्षी अकाली निधन झालेले एनसीएफचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जसपालसिंग विर्दी ट्रिब्युट राईडचे नाशिक सायकलिस्टतर्फे येत्या रविवारी (दि. 8) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता सुरू होणाऱ्या 20 किमीच्या राईडसाठी सर्व वयोगटातल्या 300 हुन अधिक सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. याचवेळी एनआरएम राईड देखील होणार आहे.
सायकलप्रेमींचे लाडके असलेल्या जसपाल सिंग विर्दी यांचे मागील वर्षी 8 जुलै रोजी एका सायकल राईड दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेकांना चटका देणाऱ्या या बातमीने नाशिक हळहळले. क्रीडाप्रेमींना हा एकप्रकारे झटकाच होता. जसपाल सिंग यांनी नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजवण्यासाठी अनेकप्रकारे प्रयत्न केले. नाशिक शहराला सायकल कॅपिटल बनविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. नाशिकमधील प्रत्येक सायकलप्रेमी जसपालसिंग यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे.
एनआरएमच्या दुसऱ्या पर्वातील सातव्या राईडचे आयोजन याच दिवशी जसपालसिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या नाशिक सायकलिस्टचा महत्वपूर्ण उपक्रम एनआरएम सायककिंगच्या दुसऱ्या पर्वातील सातव्या राईडचे आयोजन करण्यात आले आहे. 40 किमी आणि 80 किमीच्या राईड होणार होणार आहेत.
जस्सी राईड यशस्वी होण्यासाठी एनआरएम हेड नीता नारंग, सोफिया कपाडिया, नितीन कोतकर ही टीम प्रयत्न करत आहे. जसपालसिंग विर्दी ट्रिब्युट राईड मध्ये जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी केले आहे.
याअंतर्गत दीपक भोसले याचेकडून जसपालसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावरकर जलतरण तलावाच्या वाहनतळावर सायकल स्टँडची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..