नुकतेच भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग ‘कोन बनगा करोडपती १३’ या कार्यक्रमात आले होते. या दोघांनी क्रिकेटशी संबंधीत अनेक जुने किस्से सांगितले आहेत. त्यानंतर आता ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हाॅकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश हे दोन्ही खेळाडू अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव मोठे करणारा नीरज चोप्रा कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात हाॅट सीटवर बसणार आहे. चाहत्यांसाठी ही एक आनंदाजी बातमी आहे. त्याच्यासोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या हाॅकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेशही दिसणार आहे.
सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की,”आपल्या देशाचे नाव रोशन करणारे केबीसी १३ च्या मंचावर येणार आहेत, टोकियो ऑलिम्पिक २०२० चा सुपर्णपदकविजेता नीरज चोप्रा आणि श्रीजेश. ऐका त्यांचा संघर्ष आणि ऑलिम्पिकमधील अनुभव.”
नीरज शिकवणार हरियाणवी भाषा
प्रोमोमध्ये दिसत आहे की अमिताभ बच्चन दोन्ही खेळाडूंना विचारतात की, “मी मेडलला स्पर्श करू शकतो का ?” यानंतर श्रीजेश आणि नीरज हे दोघे मेडल अमिताभच्या हातात देतात. अमिताभ बच्चन मेडलला पाहून भावूक होतात आणि सेटवर शांतता पसरते. प्रोमोमध्ये नीरज अमिताभला हरियाणवी भाषा शिकवताना दिसत आहे.
श्रीजेशने सांगितला अनुभव
श्रीजेशने त्याचा एक अनुभव सांगितला आहे, कशाप्रकारे ऑलिम्पिकनंतर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी बदलल्या आहेत. तो म्हणाला, “आम्ही २०१२ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालो, पण एकही सामना जिंकलो नाही. भारतात जेव्हा माघारी आलो तेव्हा सर्व लोकं आमच्यावर हसत होते. कुठे कार्यक्रमात गेलो तर आम्हाला कुठे मागच्या कोपऱ्यात बसवले जायचे. खूप जास्त बेइज्जती केली गेली, आम्ही कशासाठी हाॅकी खेळत आहोत ?’
‘टोकियो २०२० मध्ये खेळाडूंना एकच सांगितले की, हा विचार करा की पुढचा सामनाचं नाहीये. जेव्हा मेडल मिळाले, तेव्हा असे वाटले की, आतापर्यंत जेवढे ऐकले, जेवढा संघर्ष केला, जेवढे रडलो, सगळं दूर झालं आहे.”
https://www.instagram.com/p/CTtRg2wKCRr/
नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश हे शुक्रवाराच्या (१७ सप्टेंबर) विशेष भागात रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर
अफगाणिस्तान क्रिकेटविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पेनला ‘या’ अनुभवी खेळाडूने सुनावली खरीखोटी
आयपीएल कॉलिंग! दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू इंग्लडहून पोहचले दुबईत, आता ‘इतके’ दिवस राहणार क्वारंटाईन