भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे, त्यानंतर भारताचा ऑलिम्पिक स्टार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यालाही धक्का बसला आहे. ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धा (24 मे) रोजी बंगळुरू येथे होणार होती, परंतु सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे भालाफेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
या स्पर्धेत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भारतीय भूमीवर परतणार होता, ज्यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी होणार होते. संघाने दिलेल्या अधिकृत निवेदनात खेळाडूंच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयोजक संघाने म्हटले आहे की भारतीय सैन्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि येत्या काही दिवसांत या स्पर्धेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.
नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा फक्त एका दिवसासाठी आयोजित केली जाणार होती, ज्यामध्ये ग्रेनेडाचा 2 वेळा विश्वविजेता अँडरसन पीटर्स देखील सहभागी होणार आहे. त्यांच्याशिवाय, जर्मनीचा थॉमस रोलर आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ज्युलियस येगो यांच्यासह अनेक मोठे स्टार सहभागी होणार आहेत.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, नीरज चोप्राने पाकिस्तानचा भालाफेक स्टार आणि 2024चा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला आमंत्रित केले होते, परंतु नंतर त्याने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले आमंत्रण मागे घेतले. खरे तर, या आमंत्रणामुळे नीरज चोप्राला लोकांनी प्रचंड ट्रोल केले.