भारताचा ऑलिम्पिक सुपर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे नाव इतिहासाच्या पानांवर लिहिले गेले आहे. सोमवारी (22 मे) नीरज चोप्रा याने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या क्रमवारीत जगातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच एथलिट आहे. त्याने महान भालाफेकपटू एंडरसन पीटर्सला मागे टाकत ही कामगिरी केली आहे.
टोकिओ ऑलिम्पिक्स 2021 मध्ये नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने भारतासाठी सुवर्णपदक मिळवले. तो ऍथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला होता. त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकून ही कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये मिळालेले हे यश निरजसाठी खास होते. पण तो तितक्यात थांबला नाही. त्याने ज्युरीखमध्ये पार पडलेल्या डायमंड लीगमध्ये 89.63 मीटर लांब भाला फेकला आणि सुवर्णपदक जिंकले. या प्रदर्शनाच्या जोरावरच चोप्रा भालाभेक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. नीरजने 88.67 मीटर भाला फेकून डायमंड लीग जिंकली होती. याच स्पर्धेत दुसरा क्रमांक मिडलिस्टच्या जाकूब वादलेच याचा आला होता. दुसऱ्या क्रमांकासाठी या खेळाडूने 88.62 मीटर भाला फेकला होता. तिसऱ्या क्रमांकावरील एंडरसन पीटर्सने 85.88 मीटर लांब भाला फेकला होता.
नीरजचोप्राने ही स्पर्धा जिंकल्यानंतर माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्याने आपले पुढचे लक्ष पॅरिस ऑलिम्पिक्सवर असल्याचेही सांगितले. पुढच्या वर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स आयोजित केली जाणार आहे. नीरज म्हणाला, “हा विजय खूप कठीण होता. पण मला आनंद आहे की, माझ्यासाठी चांगली सुरुवात राहिली. मला अपेक्षा आहे की, येणाऱ्या स्पर्धांमध्येही मी पहिल्या क्रमांकावर असेल आणि सातत्याने चांगले प्रदर्शन करत राहील.”
“सर्व ऍथलिट्ससाठी आव्हान कठीणच होते. पण मी या विजयामुळे समाधानी आहे. मला आनंद होत आहे. ही एक चांगली सुरुवात होती आणि याठिकाणचे वतावरणही अप्रतिम होते. अनेकजण माला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते आणि तेदेखील या विजयाने आनंदी आहेत,” असेही नीरज पुढे म्हणाला. (Neeraj Chopra has become the best javelin thrower in the world rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final। रवी शास्त्रींनी निवडली भारत-ऑस्ट्रेलियाची संयुक्त प्लेईंग इलेव्हन, फक्त चार भारतीयांना संधी
“गिलला एक कार गिफ्ट द्या”, भारतीय दिग्गजाने केली मुंबई इंडियन्सकडे मागणी