भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. तो डायमंड लीगच्या फायनलमध्ये आपला दावा ठोकेल.
डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला चार फेऱ्यांमध्ये भाग घ्यावा लागतो. त्यानंतर अंतिम यादी पॉइंट टेबलच्या आधारे तयार केली जाते. नीरज चोप्रा दोहा आणि लुसाने येथील इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तो एकूण 14 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, ज्यामुळे त्याला अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळाला.
डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स अव्वल स्थानी राहिला. त्यानं 29 गुण मिळवले. जर्मनीचा ज्युलियन वेबर 21 गुणांसह दुसऱ्या तर चेक प्रजासत्ताकचा जेकब वॉलेस 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नीरज चोप्राचा हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो डायमंड लीगच्या लॉसने फेरीत आला, जिथे त्यानं 89.49 मीटर थ्रो केला. नीरजने पॅरिस आणि झुरिच मधील फेरीत भाग घेतला नव्हता.
डायमंड लीग 2024 चा अंतिम सामना 14 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज भारतीय वेळेनुसार रात्री 11:52 वाजता सुरू होईल. तुम्ही याचं थेट प्रक्षेपण ‘स्पोर्ट्स 18’ नेटवर्कवर पाहू शकता. याशिवाय मोबाईलवर तुम्ही जिओ सिनेमा (Jio Cinema) ॲपवर हा सामना पाहू शकता.
डायमंड लीगमध्ये ॲथलेटिक्स अंतर्गत प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्या जातात. अंतिम फेरीत चॅम्पियन बनणाऱ्या खेळाडूला 30 हजार अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळतं. भारतीय चलनात ही रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. तर उपविजेत्याला सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळतं.
भालाफेकच्या अंतिम फेरीत एकूण 7 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी नीरजला ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल. याशिवाय ज्युलियन वेबर (जर्मनी), जेकब वालॅच (चेक प्रजासत्ताक), रॉडरिक डीन (जपान), अँड्रियन मार्डर (मोल्डोव्हा) आणि आर्थर (युक्रेन) हे फायनलमधील अन्य ॲथलीट्स आहेत.
हेही वाचा –
सरफराज खानचा खराब फॉर्म चिंतेचा विषय, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पत्ता कट होणार?
दणका! 17 षटकार 5 चाैकार, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची झंझावाती शतकी खेळी
चक दे इंडिया! भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा, कमबॅक करत नोंदवला शानदार विजय