---Advertisement---

दणका! 17 षटकार 5 चाैकार, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची झंझावाती शतकी खेळी

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था खुपच चिंताजनक होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेच्या तळाशी राहिला होता. परिणामी आता फ्रँचायझी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आपल्या संघात अनेक मोठे बदल करू शकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. बऱ्याच वर्षापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असलेला अनुभवी फलंदाज विष्णू विनोदने सध्या सुरु असलेल्या केरळ क्रिकेट लीग टी20 मध्ये झंझावाती शतक ठोकले. विनोदच्या या स्फोटक फलंदाजीनंतर सर्वत्र त्याची चर्चा होऊ लागली.

त्रिशूर टायटन्स आणि अलेप्पी रिपल यांच्यात झालेल्या सामन्यात विनोदने 45 चेंडूत 17 उत्तुंग षटकार आणि 5 कणखर चौकारांच्या मदतीने 139 धावा केल्या. फलंदाजी दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 308.88 राहिला आहे. त्याच्या या डावात त्याने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या शानदार खेळीसाठी विष्णूला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.

या सामन्यात अलेप्पी रिपल प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संघाने 20 षटकात 181/6 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशूर टायटन्सने केवळ 12.4 षटकांत विजयाची नोंद केली. विष्णू विनोदच्या 139 धावांच्या खेळीमुळे त्रिशूर टायटन्सने त्यांच्यासमोर मोठे लक्ष्य असतानाही एकतर्फी विजय मिळवला.

आयपीएल 2024 मध्ये विष्णू विनोद मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होता. परंतु दुखापतीमुळे तो मुंबईसाठी एकही सामना खेळू शकला नाही. 2024 मध्ये झालेल्या मिनी लिलावात मुंबईने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. विष्णूने 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबईसाठी 3 सामने खेळले. त्याने 2017 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. विष्णूने आतापर्यंत एकूण 6 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 6 डावात फलंदाजी करताना त्याने 56 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 30 होती.

हेही वाचा-

चक दे इंडिया! भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा, कमबॅक करत नोंदवला शानदार विजय
टीम इंडियाला मिळाला रोहितचा बॅकअप ओपनर, दुलीप ट्रॉफीत ठोकलं शानदार शतक!
मेगा लिलावापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूचा धुमाकूळ, आयपीएल संघांना दिला इशारा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---