---Advertisement---

अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, World Athletics Championshipमध्ये जिंकले रौप्य पदक

On: रविवार, जुलै 24, 2022 8:45 AM
Neeraj-Chopra
---Advertisement---

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने आता अजून एक मोठी कामगिरी केली आहे. सध्या जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धा खेळली जात आहे. रविवारी (२४ जुलै) या स्पर्धेतील अंतिम सामना खेळताना नीरजने रौप्य पदक जिंकत इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने अंतिम सामन्यात ८८.१३ मीटरच्या अंतरावर भाला फेकत ही दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

हे भालाफेकीत जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पटकावलेले पहिलेच पदक आहे. तर जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या ऍथलिट्सने मिळवलेले पहिलेच रौप्य पदकही आहे. याबरोबरच नीरज जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिलाच पुरुष ऍथलिट बनला आहे. तर अशी कामगिरी करणारा दुसराच भारतीयही बनला आहे. शिवाय, जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय आहे.

तर ग्रेनॅडियनचा भालाफेकपटू एँडरसन पीटर्स याने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने ९०.५४ मीटरचा भाला फेकला आहे.

नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत लांब फेकलेला भाला ८९.४ मीटर आहे. त्याने २०१७ मध्ये लंडन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही भाग घेतला होता, पण त्याठिकाणी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८२.२६ राहिली होती. त्यावेळी अंतिम फेरीत स्थान बनवण्यासाठी खेळाडूंना ८३ मीटर भाला फेकणे गरजेचे होते, त्यामुळे नीरजला अंतिम फेरीत संधी मिळाली नव्हती. परंतु यंदा त्याने जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत स्थान बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात पदकही काबीज केले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी

पुढील वर्षी हार्दिक होणार निवृत्त?

WIvsIND: सामना शेवटच्या चेंडूकडे जात होता अन् कोच द्रविडला घाम फुटत होता, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---