---Advertisement---

हिम्मत असावी तर अशी! पाय फ्रॅक्चर झाला असूनही ‘या’ दिग्गजाने केली गोलंदाजी, सर्वत्र होतंय कौतुक

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 8:33 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान २००२ मध्ये झालेल्या एका कसोटी सामन्यात माजी भारतीय गोलंदाज अनिल कुबंळे यांच्या जबड्याला चेंडू लागला. तरीही पूर्ण चेहऱ्यावर बॅन्डेज लावून या दिग्गजाने गोलंदाजी केली. एवढेच नाही तर, वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज ब्रायन लाराची विकेटही घेतली. अनिल कुंबळेप्रमाणे कित्येक क्रिकेटपटूंनी आपल्या दुखापतींना दुर्लक्षित करत मैदानावर उतरण्याचे साहस दाखवले आहे. या वीर खेळाडूंच्या यादीत एका नव्या नावाची भर पडली आहे. हा खेळाडू म्हणजे, ‘निल वॅगनर’.

न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाने पायाचा पंजा फ्रॅक्चर झाला असूनही पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजी केली. त्याच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाहीन आफ्रिदीमुळे झाली दुखापत

गेल्या दोन दिवसांपासून बे ओव्हल स्टेडियम येथे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंड संघाने ४३१ धावा केल्या होत्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) वॅगनर अंतिम षटकात फलंदाजी करत होता. यादरम्यान पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा एक यॉर्कर वॅगनरच्या उजव्या पंज्याला लागला.

त्यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीच्या षटकात तो गोलंदाजी करू शकला नाही. पण दुसऱ्या दिवसाखेर त्याने तीन षटके गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॅगनरच्या पंज्याचा स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये त्याचा पंजा फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. मात्र त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याने डॉक्टरांनी त्याला गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.

दुखापती असूनही गोलंदाजी करत घेतल्या दोन विकेट्स

त्यामुळे सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वॅगनरने दुखापतीचा विचार न करता गोलंदाजी करण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे, पूर्ण दिवसात त्याने १८ षटके गोलंदाजी करताना संघाला २ महत्त्वपुर्ण विकेट्सही मिळवून दिल्या. पाकिस्तानी क्रिकेटपटू फवाद आलम याला अवघ्या ९ धावांवर; तर शाहीन आफ्रिदीला फक्त ६ धावांवर बाद करण्याचा पराक्रम वॅगनरने केला. त्यामुळे पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांवरच संपला आणि न्यूझीलंडने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी मिळवली.

कसोटी कारकिर्दीत गाठलाय २९५ विकेट्सचा टप्पा

३५ वर्षीय डावखुरा गोलंदाज वॅगनर गेल्या आठ वर्षांपासून न्यूझीलंड कसोटी संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. नुकतेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कारकिर्दीतील ५० कसोटी सामने पूर्ण केले आहेत. दरम्यान २९.३३च्या सरासरीने त्याने २९५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांची गणना केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

आयसीसी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणारी एलिसा पेरी म्हणाली, ‘इतरही उत्तम महिला टी20 खेळाडू आहेत, पण…’

नया है ये…! न्यूझीलंडच्या प्रेक्षकाने चक्क स्वतः बनवला पाकिस्तानी खेळाडूंच्या चुकांचा स्कोर बोर्ड

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---