नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला न्यायालयाने बला’त्कार प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एका अल्पवयीन मुलीने लामिछाने वर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला होता. त्याप्रकरणी काठमांडू जिल्हा न्यायालयाने संदीप लामिछाने याला 8 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
बुधवारी (15 मे) पाटण उच्च न्यायालयाने संदीप लामिछानेला निर्दोष ठरवले. त्यामुळे आता तो आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहे.
संदीप हा नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू आहे. संदीपने नेपाळकडून 51 वनडे आणि 52 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 112 आणि 98 विकेट्स घेतल्या आहेत.
नेपाळने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, तरीही आयसीसीच्या नियमानुसार 25 मे पर्यंत संघात बदल होणे शक्य असल्याने संदीपला संधी मिळू शकते. रोहित पौडेलच्या नेतृत्वाखाली नेपाळचा संघ खेळणार आहे. 4 जूनला नेपाळचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. ( Nepal Cricketer Sandeep Lamichhane Acquitted of Rape Charges Available For T20 World Cup Selection )