अफगाणिस्तान संघाप्रमाणेच नेपाळही क्रिकेटमध्ये चांगली प्रगती करताना दिसून येत आहे. त्यांनी काल पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवत वनडे क्रिकेटचा दर्जाही प्राप्त केला.
झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता फेरीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नेपाळने पापुआ न्यू गिनी संघावर मात केली आहे. पापुआ न्यू गिनी संघाला नेपाळने संदीप लेमिच्छन आणि दीपेंद्र सिंग एरीने घेतलेल्या प्रत्येकी ४ विकेट्सच्या जोरावर २७.२ षटकातच ११४ धावांवर सर्वबाद केले होते.
यानंतर ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळकडून दीपेंद्र सिंगने अर्धशतकही केले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर नेपाळला पापुआ न्यू गिनीवर विजय मिळवता आला.
नेपाळने मिळवलेल्या वनडे क्रिकेटच्या दर्जामुळे पापुआ न्यू गिनी आणि हाँग काँगला मात्र त्यांचा वनडे दर्जा गमवावा लागला आहे. वनडे दर्जा मिळवण्यासाठी एकच जागा उपलब्ध होती आणि या जागेसाठी नेपाळ, पापुआ न्यू गिनी आणि हाँग काँगमध्ये स्पर्धा होती.
यामुळे आता नेपाळही नेदर्लंड्स प्रमाणे २०२० मध्ये होणाऱ्या १३ संघांमधील वनडे लीग स्पर्धेत सामील होईल. तसेच २०२२ पर्यंत स्कॉटलंड आणि युएईनेही वनडे क्रिकेट दर्जा पुन्हा मिळवला आहे. या दोन्ही संघांनी विश्वचषक पात्रता फेरीच्या पहिल्या सहा संघांमध्ये स्थान मिळवले आहे.
Nepal have made a steady start in their chase of 240 against Namibia in #WCL. Follow LIVE: https://t.co/wRQFpiROd9 pic.twitter.com/lbcaahvDDQ
— ICC (@ICC) April 18, 2016