अलिकडच्या काळात क्रिकेटमध्ये विजय मिळवणे, हेच प्रत्येक संघाचे उद्दिष्ट दिसते. त्यामुळे दिवसेंदिवस क्रिकेटमधील खेलाडूवृत्ती नाहीशी होताना दिसत आहे. क्रिकेटपटू सामना जिंकण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. अनेकदा मैदानात खेळाडूंमध्ये वाद होतानाही दिसतो. परंतु, यादरम्यान असेही काही खेळाडू असतात, जे त्यांच्या मैदानावरील वर्तनामुळे कौतुकास पात्र ठरतात. हे खेळाडू इतर खेळाडूंसाठी एक आदर्श ठेवण्याचे काम करत असतात. असेच एक चित्र नेपाळ आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात पाहायला मिळाले.
ओमानमध्ये सध्या चौरंगी मालिका खेळली जात आहे. सोमवारी या मालिकेत आयर्लंड आणि नेपाळ (Ireland vs Nepal t20i) यांच्यातील टी२० सामना पार पडला. आयर्लंडने या सामन्यात १६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात असे काही घडले, जे पाहून चाहत्यांची मने सुखावली आहेत.
सामन्यादरम्यान फलंदाज क्रीजपासून खूप दूर होता, पण तरीही यष्टीरक्षकाने त्याला धावबाद केले नाही. याच्यामागचे कारणही तसेच होते. या घटनेनंतर नेपाळचा यष्टीरक्षक फलंदाज आसिफ शेख (Asif Sheikh) याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आयर्लंड संघाच्या फलंदाजीवेळी मार्क एडेर आणि एंडी मॅकब्रायन हे दोघे फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उपस्थित होते. नेपाळाचा गोलंदाज कमल सिंग गोलंदाजी करत होता. एडेरने एक शॉट खेळला आणि खेळपट्टीवरील दोन्ही फलंदाज एक धावा घेण्यासाठी पळाले. धावताना गोलंदाजाच्याच्या पायात मॅकब्रायनचा पाय अडकला आणि खाली पडला. त्यावेळी यष्टीरक्षक आसिफ शेखकडे मॅकब्रायनला धावबाद करण्याची पूर्ण संधी होती, पण त्याने तसे केले नाही. आसिफने दाखवलेल्या या खेलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Hopefully this moment will win “ @ICC Spirit of the Year” award for @CricketNep. @CricketBadge was spot on with his comments in the commentary box.
A moment to cherish for @Sandeep25 . Well done #Cricket @cricketireland #OmanCricket @ICC @momocricket pic.twitter.com/FvqMTGnJO5
— Abhishek Shekhawat (@abhi07cricket) February 14, 2022
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर नेपाळ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकांमध्ये १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळ संघ ९ विकेट्सच्या नुकसानावर १११ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी आयर्लंडने १६ धावा राखून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!
चुरसीच्या लढतीनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण संघातील सामना ३१-३१ ने बरोबरीत