टी20 विश्वचषक 2024 चा 23वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता. उभय संघांमधील ही लढत फ्लोरिडाच्या मैदानावर होणार होती. मात्र पावसामुळे हा सामना नाणेफेक न होताच रद्द झाला. यानंतर दोन्ही संघांना 1-1 अंक वाटून देण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांचं नुकसान झालं असून दक्षिण आफ्रिकेची टीम सुपर 8 साठी पात्र ठरली आहे.
‘ड’ गटात श्रीलंकेचे आतापर्यंत 3 सामने झाले असून, दोन सामन्यांध्ये त्यांचा पराभव झाला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. श्रीलंकेकडे फक्त एक गुण असून, येथून सुपर 8 साठी पात्र होणं त्यांच्यासाठी जवळपास अशक्य आहे. दुसरीकडे, नेपाळचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्यांची अडचण देखील वाढली आहे. मात्र त्यांच्याकडे सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेपेक्षा जास्त चांगली संधी आहे. नेपाळला येथून सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांचा पराभव करावा लागेल. तसेच त्यांना अपेक्षा करावी लागेल की, नेदरलँड्सचा संघ त्यांच्या उर्वरित दोन्ही सामन्यांत पराभूत होईल.
फ्लोरिडामध्ये अजून तीन सामने खेळले जाणार असून, पुढील आठवड्यात देखील इथलं हवामान खराब असण्याचीच शक्यत वर्तवण्यात आली आहे. अशात, पुढील तीन सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्ययं येतो का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. या ठिकाणी पुढील सामना 14 जून रोजी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्यानंतर 15 जून रोजी भारत आणि कॅनडा तर 16 जून रोजी पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात लढत होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास
भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये
“कृपया लक्ष द्या!” उमर अकमलची ही कसली पोस्ट? कमेंट्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल