टी20 विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी पात्रता फेरीतील पाचवा सामना नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स असा खेळला गेला. आपले पहिले सामने जिंकलेल्या या दोन्ही संघां दरम्यानचा हा सामना रोमांचक झाला. अखेर नेदरलँड्सने पाच गड्यांनी विजय मिळवत मुख्य फेरीच्या दिशेने निर्णय पाऊल टाकले. अष्टपैलू बास डी लिडे हा सामन्याचा मानकरी ठरला.
Netherlands clinch yet another last-over thriller and go on top of Group A in First Round 👏
📝 Scorecard: https://t.co/YahtXKo0pZ
Head to our app and website to follow #T20WorldCup action 👉 https://t.co/76r3b7l2N0 pic.twitter.com/i0uaE5mbJv
— ICC (@ICC) October 18, 2022
अ गटातील हा सामना जिलॉंग येथे खेळला गेला. नामिबिया संघाने आपल्या पहिल्या सामन्यात आशिया चॅम्पियन श्रीलंकेचा दारूण पराभव केला होता. तर नेदरलँड्सने युएईला नमवत विजय सुरुवात केली या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय तितका योग्य ठरला नाही. नेदरलँड्सच्या सर्वच गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित मारा केला. त्यामुळे नामिबियाच्या फलंदाजांना मोकळ्या हाताने फलंदाजी करता आली नाही. संघाचा अष्टपैलू जान फ्रायलिंक याने सर्वाधिक 43 धावा केल्या. नामिबियाला निर्धारित 20 षटकात केवळ 6 बाद 121 धावा करता आल्या.
या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सला विक्रमजीत सिंग व मॅक्स ओडे यांनी शानदार अर्धशतकी सुरुवात दिली. दोघांनी अनुक्रमे 39 आणि 35 धावा केल्या. संघाचे शतक झाल्यावर नेदरलँड्सला दोन धावांच्या अंतराने तीन धक्के बसले. मात्र, बास डी लिडे याने अखेरपर्यंत संयम दाखवत 30 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
अ गटातील समीकरणे आता काहीशी अवघड झाली आहेत. नेदरलँड्सने सलग दोन सामने जिंकले असले तरी त्यांचा अखेरचा सामना श्रीलंकेशी होईल. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या श्रीलंकेला युएई व नेदरलँड्सशी दोन हात करायचे आहेत. तर, नामिबिया आपला अखेरचा सामना युएईशी खेळेल. अ गटातून अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र होतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमावर विराट, रोहितची नजर! जयवर्धनेची 8 वर्षांची बादशाहत उध्वस्त करण्याची संधी
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक