पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी आता संघ जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर व दक्षिण आफ्रिकेनंतर आता नेदरलँड्सने आपला संघ जाहीर केला आहे. पात्रता फेरीतून विश्वचषकासाठी अव्वल 16 संघात नेदरलँड्सचा समावेश झाला होता. त्यांनी विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या संघात दिग्गज अष्टपैलू वॅन डर मर्व्ह व कॉलिन अकरमन यांना संधी दिली आहे.
JUST IN 🚨
Netherlands have named their squad for the ICC Men's #T20WorldCup 2022 👇🏻https://t.co/w1lqGzdrrb
— ICC (@ICC) September 6, 2022
नेदरलँड्सने बुलावायो येथील टी20 विश्वचषक क्वालिफायरद्वारे ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. क्वालिफायरच्या अंतिम फेरीत झिम्बाब्वेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, नेदरलँड्सने अंतिम फेरीत प्रवेश करत ऑस्ट्रेलियासाठी आपले तिकीट पक्के केले होते. नेदरलँड्सला मुख्य फेरीत खेळण्याआधी पुन्हा एकदा एक पात्रता फेरी खेळावी लागेल.
विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रायन कुक म्हणाले, “आम्ही आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा आणि अनुभवाच्या मिश्रणासह एक संतुलित संघ तयार केला आहे. या संघाकडून आम्हाला विश्वचषकात मोठ्या अपेक्षा आहेत.”
या संघात संधी दिला गेलेला व्हॅन डर मर्व्ह हा दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. तर कॉलिन अकरमन हा इंग्लंडमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत असतो.
टी20 विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, व्हॅन डर मर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.