नेदरलँड क्रिकेट संघासाठी गुरुवार (6 जुलै) ऐतिहासिक ठरला. वनडे विश्वचषक 2023 साठीच्या क्वॉलिफायर सामन्यांमध्ये गुरुवारी नेदरलँडने स्कॉटलँडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँडसाठी बास डी लीड याने जबरदस्त प्रदर्शन करून नेदरलँडला विश्वचषकात स्थान मिळवून दिले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. विशेष म्हणजे यापूर्वी त्याचे वडील टीम हेदेखील नेदरलँडसाठी तीन विश्वचषक खेळले आहेत.
हा सामना दोन्ही संघांसाठी करू अथवा मरो असा होता. कारण या सामन्यातून वनडे विश्वचषकासाठीचा अखेरचा संघ निश्चित होणार होता. स्कॉटलंडने शानदार फलंदाजी करत नेदरलँड्ससमोर 278 धावांचे आव्हान उभे केले. संघ अडचणीत सापडलेला असताना अष्टपैलू डी लीड याने वादळी फलंदाजी करताना केवळ 92 चेंडूमध्ये 123 धावा फटकावल्या. तत्पूर्वी त्याने गोलंदाजी करताना पाच बळी देखील टिपलेले. अशी कामगिरी करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला.
बास डी लीड याने नेदरलँडसाठी आतापर्यंत 29 वनडे आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावापुढे अनुक्रमे 642 आणि 610 धावांची नोंद आहे. गोलंदाजाच्या रुपात त्याने वनडे क्रिकेटमध्ये 19, तर टी-20 क्रिकेटमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे बास याचे वडील टीम हे देखील नेदरलँडचे मान्यवर क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांनी 1996, 1999 2003 अशा तीन विश्वचषकांमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व केलेले. विश्वचषकाच्या मंचावर टीम यांनी भारताविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड तसेच पाकिस्तानविरुद्ध सईद अन्वर व इंझमाम उल हक यांना देखील त्यांनी बाद केले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 29 वनडे सामने खेळताना चारशे धावा व 29 बळी टिपले होते.
(Netherlands Bass De Leede Heroics His Father Tim De Leede Play Three ODI World Cup For Netherlands)
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि विजयसोबतच्या तुलनेविषयी शिवम दुबेचे मोठे विधान; म्हणाला, ‘मी इतर खेळाडूंना…’
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’