---Advertisement---

अखेर टी20 विश्वचषकात नेदरलँड्सने उघडले खाते! झिम्बाब्वेवर केली 5 गड्यांनी मात

---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) ब गटातील झिम्बाब्वे व नेदरलँड्स (ZIMvNED) यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यात नेदरलँड्सने झिम्बाब्वेला 5 गडी राखून पराभूत करत स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला.

 

स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या या दोन्ही संघातील सामना रंगेल अशी अपेक्षा सर्वांना होती. झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी काहीसा चुकीचा ठरवला. झिम्बाब्वेने आपले पहिले तीन खेळाडू 6 षटकात केवळ 20 धावांत 3 बळी गमावले. त्यानंतर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू सिकंदर रझा याने डावाची जबाबदारी घेतली. त्याने आक्रमक धोरण स्वीकारत नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. त्याने 24 चेंडूवर 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. ‌रझा बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकीरी केली. त्यामुळे झिम्बाब्वेचा डाव‌ 117 धावांवर संपुष्टात आला. वॅन मिकरेनने नेदरलँड्ससाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या केवळ 118 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला मायबर्गच्या रूपाने 17 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर मॅक्स ओ डाऊड व बेन कुपर यांनी 72 धावांची भागीदारी केली. कुपरने 32 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्यानंतर एकापाठोपाठ चार बळी नेदरलँड्सने गमावले. ओ‌ डाऊडने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. अखेरीस दोन षटके शिल्लक असताना नेदरलँड्सने 5 गडी राखून विजय संपादन केला. मिकरेन याला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. नेदरलँड्स आपला अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध तर, झिम्बाब्वे भारताविरुद्ध खेळताना दिसेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाज पाहून चाहत्यांचीही वाढली चिंता
अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---