आयसीसी वनडे विश्वचषक 2023साठी झिम्बाब्वेमध्ये क्वॉलिफायर सामने खेळले जात आहे. सोमवारी (3 जुलै) नेदरलँड आणि ओमान यायंच्यात आमना सामना झाला. ओमान संघाला या सामन्यात 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नेदरलँडने या सामन्यात विजय मिळवल्यामुळे त्यांचे क्वॉलिफायर स्पर्धेतील स्थान कायम राहीले. विक्रमजीत सिंग या सामन्यात 110 धावांची महत्वपूर्ण खेळी केली, यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला.
नेदरलँड आणि ओमान (Netherlands vs Oman) यांच्यातील या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईल नियमानुसार दिला गेला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड संघाने 48 चेंडूत 7 बाद 362 धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमान संघ फलंदाजीला आल्यामुळे पुन्हा पाऊस आला. ओमानला विजयासाठी 44 षटकांमध्ये 321 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ कशीबशी 6 बाद 246 धावांपर्यंत मजल मारू शकला.
नेदरलँडचा सलामीवीर विक्रमजीत सिंग () याने 109 चेंडूत 110 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वेस्ली बॅरेसी याने अवघ्या 65 चेंडूत 97 धावांची वादली खेळी केली. यात 10 चौकार आणि 3 षटकार मारले. प्रत्युत्तरात ओमान संघासाठी अयान खान याने 105 धावांची ताबडतोड खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शोएब खान ओमानसाठी दुसरा सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज ठरला. शोएबने 61 चेंडूत 46 धावा केल्या.
गोलंदाजी विभागाचा विचार केला, तर नेदरलँड्सला आर्यन दत्त याने 10 चेंडूत 31 धावा करून 3 विकेट्स घेतल्या. रायन क्लेन याने 9 चेंडूत 34 चेंडूत 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी ओमान संघासाठी बिलाल खान याने 10 षटकांमध्ये तब्बल 75 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नदीमने 4 षटकांमध्ये 36 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या.
विश्वचषक क्वॉलिफायर्सचा विचार केला, तर श्रीलंकन संघ आधीच विश्चषकासाठी पात्र ठरला आहे. सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वे आहे, ज्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. नेदरलँड चौथ्या क्रमांकावर आहे. नेदर्लंडने चार पैकी दोन सामने जिंकले. सुपर सिंक्स फेरीमध्ये प्रत्येक संघाला पाच सामने खेळायचे आहेत. अशात शेवटच्या सामन्यात नेदरलँडने विजय मिळवला, तर विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी त्यांच्याकडे संधी असेल. नेदरलँडला सुपर सिंक्समधील आपला शेवटचा सामना 6 जुलै रोजी स्कॉटलँडविरुद्ध खेळायचा आहे. (Netherlands lost by 74 runs against Oman)
महत्वाच्या बातम्या –
गुरुपौर्णिमा विशेष: ‘या’ दिग्गजांनी निभावली टीम इंडियाच्या गुरुची भूमिका, कोणी हिट तर, कोणी फ्लॉप
VIDEO । वेस्ट इंडीजला पोहोचता आपापसात भिडला भारतीय संघ! पाहा कोण कोणाच्या बाजूने