दिल्ली। २७ एप्रिलला पार पडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्लीने ५५ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सचा आजपर्यंतचा सर्वात तरुण ठरलेला कर्णधार श्रेयश अय्यरने नाबाद अर्धशतक करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
त्याने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत ४० चेंडूत १० षटकार आणि ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ९३ धावा केल्या. याबरोबरच त्याने कर्णधार म्हणून पदार्पण करताना केलेल्या सर्वोच्च धावा करण्याचा आणि कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एका डावात मारलेले सर्वाधिक षटकाराचाही विक्रम केला.
याआधी दिल्लीने यावर्षीच्या मोसमासाठी कर्णधारपद गौतम गंभीरला दिले होते. पण संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसेच त्याने कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही खेळण्यास नकार दिला.
हा संपूर्ण सामना गंभीरने संघाच्या डगआऊटमध्ये बसून बघीतला. पण याच दरम्यान श्रेयस मारलेला एक षटकार गंभीरच्या समोर पडला. ज्याला गंभीरने टाळ्या वाजवून दादही दिली. यामुळे त्याच्यामधल्या क्रीडाभावनेचे सर्वांनीच कौतुक केले.
🤔🤔
That six by Iyer slapped over extra cover got the @DelhiDaredevils dugout like…#DDvKKR pic.twitter.com/ZsaJWlOjXW
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2018
या सामन्यात श्रेयसने पृथ्वी शॉला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारीही रचली. यामुळे दिल्लीला २० षटकांत ४ बाद २१९ धावा करता आल्या. तर कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १६४ धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–एकवेळ फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला तो गोलंदाज आज पाकिस्तान संघात जागा मिळण्यासाठी झगडतोय
–1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल
–महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश
–मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?
–दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक