सध्या क्रिकेट जगतात आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएलचे सामने दररोज उत्कंठावर्धक होत असल्याने चाहते आयपीएलला पसंती देताना दिसत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने फलंदाजांच्या नव्या टी२० क्रमवारीची घोषणा केली आहे. या नव्या क्रमवारीत बरेच बदल झालेले दिसत आहेत.
फलंदाजांच्या क्रमवारीत झाले बदल
आयसीसीने जाहीर केलेल्या टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत काहीसा बदल झालेला दिसून आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत दमदार कामगिरी करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एका स्थानाच्या प्रगतीसह दुसरे स्थान पटकावले. इंग्लंडचा डेव्हिड मलान या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे. आझम आणि मलान यांच्या दरम्यान ४८ अंकांचे अंतर आहे.
याच मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वॅन डर डसेन तीन स्थानांच्या प्रगती कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सहाव्या स्थानी पोहोचला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या तर, केएल राहुल सातव्या क्रमांकावर आहेत.
गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचे वर्चस्व
टी२० गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. दक्षिण आफ्रिकेचा चायनामन गोलंदाज तबरेझ शामसी अव्वलस्थानी आला आहे. दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचा राशिद खान तर, तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा ऍश्टन एगर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे इंग्लंडचा आदिल रशीद वर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आहेत. विशेष म्हणजे भारताचा एकही गोलंदाज पहिल्या १० मध्ये नाही. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर १४ क्रमांकावर आहे.
अष्टपैलूंमध्ये नबी पहिल्या क्रमांकावर
आयसीसीच्या टी२० अष्टपैलूंमध्ये अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी पहिल्या स्थानी कायम आहे. बांगलादेश शाकिब अल हसन व ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानी आहेत. अष्टपैलूच्या यादीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या एकमेव भारतीय असून, तो सोळाव्या स्थानी विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध पोलार्डने केले होते नेतृत्व, तरीही दंड मात्र रोहित शर्माला; कारण घ्या जाणून
आनंद गगनात मावेना! महिद्रा यांच महागडं भिफ्ट शुबमन गीलच्या घरी पोहोचलं, फलंदाज खुश होऊन म्हणाला..