आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा झालेली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी घोषित झालेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल याच्याकडे देण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी विश्रांतीची मागणी केल्याने त्यांना या मालिकेसाठी निवडले गेले नाही. मात्र, राहुल याच्या नेतृत्वात भारताच्या नवीन वनडे संघाचे स्वरूप कसे असेल याची झलक निवड समितीने दाखवली आहे.
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
निवड समिती नाही या मालिकेसाठी रोहित व विराट यांच्यासह विश्वचषकात भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून खेळलेल्या शुबमन गिल याला देखील विश्रांती दिली आहे. तर विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमार यादव याला वनडे संघातून डच्चू दिला गेला. तसेच विश्वचषक संघाचा भाग असलेल्या शार्दुल ठाकूर देखील या संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. यष्टीरक्षक ईशान किशन हा देखील या संघाचा भाग नाही.
या सर्व फलंदाजांच्या जागी ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन व रजत पाटीदार यांना संधी मिळालीये. तर यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल व वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनी संघात पुनरागमन केले. वेगवान गोलंदाजी सर्व धुरा युवा खेळाडूंच्या खांद्यावर असेल. मुकेश कुमार, आवेश खान व अर्शदीप सिंग हे संघाचे वेगवान गोलंदाज असतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
(New Look Team India ODI Setup Under KL Rahul Captaincy For South Africa Tour Rajat Patidar Sai Sudarshan First Time In Team India)
महत्वाच्या बातम्या –
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड