टी20 विश्वचषकात भारतीय संघाच्या पराभवामुळे बीसीसीआयने कठोर पाऊले उचलण्यात आली होती. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बीसीसीआयने बरखास्त केली होती. मात्र, आता बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर एक नवी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने या समितीवर रणजी ट्रॉफीची जबाबदारी सोपवली आहे. रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाची सुरुवात 13 डिसेंबर पासून होणार आहे.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील सामन्यांच्या निरीक्षणाची जबाबदारी सदस्यांना वाटून देण्यात आली आहे. बीसीसीआय आणि राज्य संघांच्या सुत्रानुसार माहिती मिळत आहे की अध्यक्ष चेतन शर्मा मोहालीमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पंजाब आणि चंदीगढ या संघांमधील सामन्याचे निरीक्षण करतील, तर सुनिल जोशी पुण्यात खेळवला जाणारा महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली या सामन्याचे निरीण करतील. हरविंदर सिंग आंध्रप्रदेश विरुद्ध तामिळनाडू हा सामना बघतील तर, देबाशीष मोहंती बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्याचे निरीक्षण करतील.
बीसीसीआयच्या सल्ल्यावर हा निर्णय घेण्यात आला असून बीसीसीआयला नव्या निवड समितीचा निर्णय देखील करायचा आहे. निवड समितीच्या सदस्यांच्या मुलाखती अजून निश्चित झालेल्या नाहीत. रणजी ट्रॉफीची दुसरी फेरी 20 डिसेंबरपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे, तोपर्यंत नवी निवड समिती घोषीत केली जाऊ शकते. बीसीसीआयची शीर्ष परिषदेची 21 डिसेंबरला बैठक बोलवण्यात येणार आहे आणि या बैठकीत नव्या निवड समितीला मंजूरी मिळू शकते.
भारतीय संघ 2013 नंतर एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. त्यानंतर यावर्षी आशिया चषक, टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली. त्यामुळे निवड समिती आणि भारतीय संघावर प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली. भारतीय संघातील काही खेळाडूंचे प्रदर्शन अतिसामान्य झाले होते. त्यामुळे अपयशी ठरत असलेल्या खेळाडूंना वारंवार संधी मिळत असल्याने नवे खेळाडू दुर्लक्षित राहत आहेत, अशी खंत चाहत्यांनी व्यक्त केली होती. (New responsibilties are giveb to the selectors commitee which was earlier got dissolved by the BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल