क्रिकेटमध्ये निर्धारित वेळेत सर्व षटके न फेकण्याची प्रकरणे जवळपास प्रत्येक सामन्यात दिसून येतात. नियमांनुसार संघ आणि कर्णधारांवर दंड आकारला जातो. परंतु, ही समस्या सुटत नाही. मात्र, आता इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या द हंड्रेड लीगमध्ये स्लो ओव्हर रेटची समस्या दूर करण्याचा नियम आणण्यात आला आहे. ज्याची खूप चर्चा होतेय. २१ जुलैपासून सुरू होणार्या या स्पर्धेत षटकांची गती न राखल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघांना मोठा फटका बसेल. मंगळवारी (१३ जुलै) द हंड्रेडच्या प्लेइंग कंडिशन्स जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कठोर नियमन केले गेले.
षटकांची गती कमी राखल्यास होणार नुकसान
द हंड्रेडच्या प्लेइंग कंडिशन्सनुसार, जर संघाचा ओव्हर रेट कमी असेल तर; संघाला दंड म्हणून ३० यार्डच्या वर्तुळात अतिरिक्त खेळाडू तैनात करावा लागेल. जर तसे झाले तर, फलंदाजीचा संघ त्याचा भरपूर फायदा घेईल. ३० यार्डात अतिरिक्त खेळाडू मिळाल्यास फलंदाज अधिक जोखीम घेण्यास सक्षम होतील आणि संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल. अशा परिस्थितीत सामन्यात षटकांची गती न लागलेल्या संघाला सामना जिंकणे फार कठीण जाईल. ऑस्ट्रेलियाच्या टी२० लीग बिग बॅश लीगमध्येही द हंड्रेडचा हा नियम लागू केला जाऊ शकतो. भविष्यात आयसीसी स्पर्धांमध्येही हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
असे असतील इतर नियम
द हंड्रेड लीगच्या प्रत्येक डावात १०० चेंडू टाकले जातील. एक गोलंदाज सलग पाच किंवा दहा चेंडूत गोलंदाजी करू शकेल. एक गोलंदाज जास्तीत जास्त २० चेंडू गोलंदाजी करू शकतो. स्पर्धेत नाणेफेक ही पारंपारिक पद्धतीने होणार नाही. २५ चेंडूनंतर संघ टाईम आउट घेऊ शकतात.
द हंड्रेड लीगमधील पॉवरप्ले २५ चेंडूंचा असेल. या दरम्यान, केवळ २ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर राहू शकतील.
सामना टाय झाला तर?
द हंड्रेड लीगमध्ये साखळी फेरीतील सामना टाय झाला तर, दोन्ही संघांना एक-एक गुण वाटून देण्यात येईल. मात्र, बाद फेरीतील सामने टाय झाल्यास सुपर फाईव्ह म्हणजेच प्रत्येकी पाच चेंडूंचा सामना खेळला जाईल. त्यानंतरही सामन्याचा निकाल न लागल्यास गटामध्ये अव्वल राहणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! आयपीएल २०२० फायनलमधील प्रतिस्पर्धी दिसणार एकत्र, ‘या’ संघात नियुक्ती
‘विराटने मैदानावर इशारे करण्याआधी दोनदा विचार करावा, लहान मुलेही त्याला पाहात असतात’
जेव्हा वेश बदलून अभिनेता आमिर खान गेला होता दादाच्या घरी, सेक्युरिटी गार्डने केलतं बाहेर