---Advertisement---

क्रिकेट बदलणार! 1 ऑक्टोबरपासून या नव्या नियमांत रंगणार ‘रनसंग्राम’; वाचा सविस्तर

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 4:50 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (20 सप्टेंबर) 1 ऑक्टोबर 2022 पासून बदलणार्‍या नियमांची यादी जाहीर केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील समितीने मेरिलबोन क्रिकेट क्लबला खेळांच्या नियमात बदल करण्याची शिफारस केली होती. ती शिफारस मान्य झाली असून, नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. पुढील महिन्यात होणारा टी20 विश्वचषक याच नियमांत खेळला जाईल.

नक्की कोणते नियम बदलण्यात आले आहेत ते आपण जाणून घेऊया.

1) नवीन नियमानुसार फलंदाज झेलबाद झाला तर, नवा फलंदाज स्ट्राइकवर येईल. आत्तापर्यंत झेल घेताना फलंदाजांनी एकमेकाला क्रॉस केल्यानंतर, नॉन स्ट्राइकवरील फलंदाज स्ट्राइकवर येऊ शकत होता. याचा फायदा सर्वाधिक फलंदाजी करणाऱ्या संघाला होई.

2) लाळेवर कायमस्वरूपी बंदी- कोविड-19 महामारीच्या उद्रेकानंतर जेव्हा क्रिकेट सुरू झाले तेव्हा लाळेवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. परंतु आता लाळेवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडूची चकाकी कायम ठेवण्यासाठी लाळेचा वापर करत.

3) नव्या नियमानुसार, नवीन फलंदाजाला कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये दोन मिनिटांत स्ट्राइक घ्यावी लागेल. तर टी20 मध्ये वेळेची मर्यादा ९० सेकंद असेल. यापूर्वी फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडूला कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये मैदानावर येण्यासाठी तीन मिनिटे मिळायची. आता फलंदाज निर्धारित वेळेत मैदानावर येऊन शकल्यास, विरोधी कर्णधार टाईम आउटची मागणी करू शकतो.

4) नव्या नियमानुसार, गोलंदाजांनी टाकलेला चेंडू जर खेळपट्टीबाहेर पडला आणि त्याचवेळी बॅटचा काही भाग त्या बॅटच्या मागे असेल तर, हा चेंडू खेळण्याचा अधिकार फलंदाज आला राहील. मात्र, फलंदाजाने कोणतीही हालचाल केली नाही तर, चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल. खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरेल.

5) गोलंदाजाच्या गोलंदाजीदरम्यान कोणतीही अनुचित आणि हेतुपुरस्कृत हालचाल झाल्यास पंचांकडून डेड बॉल दिला जाईल. याशिवाय फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून 5 धावा मिळतील.

6) टी20 प्रमाणेच आता वनडे क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डांच्या वर्तुळात अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागेल.

7) यापूर्वी नॉन स्ट्रायकर एन्डला होणाऱ्या धावबादच्या प्रयत्नाला मंकडिंग असे म्हटले जायचे. मात्र, आता तो शब्द हटवून थेट धावबाद म्हणून तो खेळाडू धावबाद दिला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

INDvAUS: पहिल्याच टी20 सामन्यात लागणार रेकॉर्ड्सची रांग! विराटकडे कॅप्टन रोहितला मागे टाकण्याची संधी
ठरलं एकदाचं, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची ‘हीच’ जोडी उतरणार ओपनिंगला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---